अंत्यसंस्काराच्यावेळी मृत झालेली व्यक्ती चालत येते तेव्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:41 PM2019-04-13T22:41:28+5:302019-04-13T22:47:02+5:30
मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घरी नेऊन आंघोळीची तयारी करीत असताना त्याच वेळी समोरुन ती व्यक्ती चालत आल्याने सर्वांना आश्चयार्चा धक्का बसला. त्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा जिल्हा रुणालयातून आणलेला मृतदेह एकदा निरखून पाहिला. ही व्यक्ती ती नसल्याची खात्री पटल्यानंतर तो मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शनिवारी मेहरुणमध्ये घडलेल्या या घटनेची दिवसभर चर्चा होती.
जळगाव : मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घरी नेऊन आंघोळीची तयारी करीत असताना त्याच वेळी समोरुन ती व्यक्ती चालत आल्याने सर्वांना आश्चयार्चा धक्का बसला. त्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा जिल्हा रुणालयातून आणलेला मृतदेह एकदा निरखून पाहिला. ही व्यक्ती ती नसल्याची खात्री पटल्यानंतर तो मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शनिवारी मेहरुणमध्ये घडलेल्या या घटनेची दिवसभर चर्चा होती.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी साडे दहा वाजता जिल्हा रुग्णालयाच्या भींतीजवळ ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आला. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरिक्षक संदीप आराक व सुनील जोशी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.नंतर मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. मृत व्यक्तीचे नातेवाईक मेहरुणमधील जोशी वाड्यात वास्तव्याला असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस तेथे पोहचले.अमीर शेख हा तरुण मृतदेह पाहण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आला. मृत व्यक्ती माझे मामा असून त्यांचे नाव नाजीम शेख अहमद आहेत असे सांगून त्याने मृतदेह ओळखला. त्यामुळे ही घटना घरी कळविण्यात आली. त्यानुसार मृतदेह मेहरुणमधील जोशीवाड्यात नेण्यात आला. तेथे आंघोळीची तयारी करीत असतानाच नाजीम शेख समोरुन चालत आले. त्यांना समोरुन पाहून सर्वांनाच आश्चयार्चा धक्का बसला.
मृत्यूची नोंद नाजीमच्याच नावाची
जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करताना पोलिसांनी मृत व्यक्ती म्हणून नाजीमचीच नोंद केली. नंतर ही व्यक्ती जीवंत असल्याचा प्रकार उघड झाल्याने पोलिसांचीही अडचण झाली. कागदपत्रांमध्ये फेरफार करता येत नसल्याने उशिरापर्यंत याच विषयावर मंथन सुरु होते तर नातेवाईकही जिल्हा पेठ पोलिसात थांबून होते. दरम्यान, नाजीम शेख यांची पत्नी व मुले सोडून गेल्याने २० वषार्पासून त्यांची मानसिकस्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे ते सतत बाहेरच असतात, असे नातेवाईकांनी सांगितले.