जळगावात पोलिसांनी पकडताच चोरट्यास आली मिरगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 02:08 PM2018-06-05T14:08:51+5:302018-06-05T14:08:51+5:30
बसस्थानकातून शेतकऱ्याच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणाºया संशयिताला पोलिसांनी पकडले खरे, मात्र काही तासानंतर त्याला मिरगी यायला लागल्याने पोलीस यंत्रणाही हादरली. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.५ : बसस्थानकातून शेतकऱ्याच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणाºया संशयिताला पोलिसांनी पकडले खरे, मात्र काही तासानंतर त्याला मिरगी यायला लागल्याने पोलीस यंत्रणाही हादरली. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत या संशयिताला हा जुना आजार असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, सोमवारी जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात आली, त्यानंतर उपचार करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर असली तरी पोलिसांना त्याची चौकशीच करता आलेली नाही. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच या गुन्ह्याचा उलगडा होणार आहे. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा दुसरा साथीदार व लांबविलेले पैसे कुठे आहेत, याचाही अजून उलगडा झालेला नाही. दरम्यान, त्याचा दुसरा साथीदार मुख्य संशयित असून त्याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.
शुक्रवारी रात्री सातगाव डोंगरी येथील शेतकरी संजय विष्णु वाणी (वय-४५) यांच्या हातातील ५ लाख ७५ हजार रूपये असलेले बॅग दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी लांबविली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. रात्रदिंवस तपास यंत्रणा कामाला लागली, चोरटे शोधण्यात यशही आले, मात्र नंतर ब्रेक लागला.
तोंडाला फेस यायला लागल्याने घाबरलेल्या कर्मचाºयांनी हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना सांगितला. दरम्यान, याबाबत पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनाही या संशयिताची माहिती घेवून तपासाच्या सूचना केल्या.