महामार्गावर दररोज जीव जातायं..समांतर रस्ते कधी होणार?, जळगावात पालकमंत्र्यांना खडा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:09 PM2017-12-31T12:09:41+5:302017-12-31T12:12:26+5:30

गांधी उद्यानात पाहणीप्रसंगी घडला प्रकार

When will the roads ever be complite | महामार्गावर दररोज जीव जातायं..समांतर रस्ते कधी होणार?, जळगावात पालकमंत्र्यांना खडा सवाल

महामार्गावर दररोज जीव जातायं..समांतर रस्ते कधी होणार?, जळगावात पालकमंत्र्यांना खडा सवाल

Next
ठळक मुद्देपालकमंत्री म्हणाले..तुम्ही कर भरतात का?100 कोटीतून समांतर रस्त्यांचे काम करा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31- राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून दररोज निरपराध नागरिकांचे हकनाक जीव जात आहेत. पालकमंत्री साहेब, समांतर रस्ते कधी करणार ? असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना एका सर्वसामान्य नागरिकाने महात्मा गांधी उद्यानात केल्याने खळबळ उडाली.
शाहू रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी महात्मा गांधी उद्यानाची सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाहणी केली. यावेळी ग.स. सोसायटीचे माजी व्यवस्थापक अशोक भास्कर पाटील हे त्यावेळी उद्यानात व्यायाम करीत होते. त्यांच्याजवळ येत पालकमंत्र्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांचे वयही विचारले. अशोक पाटील यांनी ते सांगितल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत असून त्यात तरुणांचे बळी जात आहे. समांतर रस्ते झाल्यास अनेकांचे जीव वाचतील, त्यासाठी समांतर रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पालकमंत्री म्हणाले..तुम्ही कर भरतात का?
अशोक पाटील यांनी समांतर रस्त्यांची अपेक्षा व्यक्त करताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांना म्हणाले, आपण मनपाचा कर भरतात का? त्यावर अशोक पाटील यांनी होय असे उत्तर दिले. त्यानंतर आयकर भरतात का? असे विचारले असता मला ‘आयकर’ लागत नाही असे पाटील म्हणाले. 
100 कोटीतून समांतर रस्त्यांचे काम करा
अशोक पाटील यांनी पालकमंत्र्यांना प्रश्न विचारल्यानंतर पालकमंत्री काही  वेळ अंतमरुख झाले. काही मिनिटानंतर त्यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना जवळ बोलवित समांतर रस्त्यांचा प्रश्न त्यांच्याकडून जाणून घेतला. जिल्हाधिका:यांनी त्यांना त्यांच्या हातावर मोबाईल ठेवत हा विषय समजून सांगितला. त्यावर पालकमंत्री म्हणाले, आपल्यास 100 कोटी दिले आहे, त्यातून समांतर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावा. 

Web Title: When will the roads ever be complite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.