अनधिकृत होर्डींग्ज कधी निघणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:23 PM2019-06-29T13:23:44+5:302019-06-29T13:24:45+5:30
मोजक्याच होर्डींग्ज लावणाऱ्यांनी महानगरपालिकेची परवानगी घेतली
शहरात विविध समस्यांनी डोके वर काढले असता त्यात अनधिकृत होर्डींग्जने सुध्दा त्यात भर टाकली आहे़ शहरात चौक-चौक होर्डींगने सजलेली आपल्याला दिसून येतात़ त्यातीलच मोजक्याच होर्डींग्ज लावणाऱ्यांनी महानगरपालिकेची परवानगी घेतलेली असते़ तर काहींकडून अनधिकृतपणे होर्डींग्ज लावलेली आहेत़ त्यामुळे काहीवेळेस रात्रीच्या सुमारा वळणावर समोरून येणारे वाहन दिसण्यास त्रास होता़ त्यातून अपघात होण्याची सुध्दा शक्यता आहे़ एवढेच नव्हे तर महानगरपालिकेचा सुध्दा महसुल बुडवला जात आहे़ याकडे महानगरपालिकाने लक्ष देण्याची गरज आहे़ अनेकवेळा मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत होर्डींग्ज, फलक, बॅनर्स लावणाऱ्यांविरूध्द कारवाई केली जाते़ मात्र, तरी देखील अनेक जण आपली जाहीरात करण्यासाठी विनापरवानगी विद्युत खाबांसह डिवायडरवर होर्डींग्ज व लहान फलके लावली जातात़ त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते़ त्यातच अतिक्रमण विभागाकडून असे होर्डींग काढून घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे़ पावसाळ्याला सुरूवात झाली आहे़ वारा-वादळामुळे हे होर्डींग हवेने उडून रस्त्यावर पडू शकतात तर कधी कोणत्या वाहनावर पडण्याची शक्यता आहे़ शहरातील आकाशवाणी चौक, अंजिठा चौक, गणेश कॉलनी, एम़जे़ कॉलेज परिसर, फेडरेशन परिसर, स्वातंत्र्य चौक परिसरात, सिंधी कॉलनी रस्ता, महाबळ रस्ता या भागांमध्य होर्डींग व फलक मोठ्या प्रमाणात लावली जातात़ या परिसरातील अनधिकृत होर्डींग्ज काढून तो भाग मोकळा करावा, जेणे करून वाहनधारकांना कुठलाही त्रास होणार नाही़
-हर्षल महाजन, पिंप्राळा परिसर