कोठे धावपळ, तर कोठे बाचाबाची
By Admin | Published: February 17, 2017 01:20 AM2017-02-17T01:20:18+5:302017-02-17T01:20:18+5:30
जि.प. निवडणूक : मतदान सकाळी संथगतीने, नंतर वाढला वेग
जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी गुरुवारी कोठे धावपळ, तर काही ठिकाणी बाचाबाची झाल्याचा अनुभव आला. दरम्यान, सकाळी मतदानाचा वेग कमी होता, दुपारनंतर मतदानाची गती वाढली.
संवेदनशील केंद्राचे व्हिडिओ चित्रण
जळगाव जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. ते म्हणाले, संवेदनशील केंद्राचे व्हिडिओ चित्रण करण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील या यावल, रावेर तर अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अमळनेर, चोपडा व चाळीसगावला ठाण मांडून होते. जळगाव उपविभागात उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सर्वच महत्त्वाच्या केंद्रांना भेटी दिल्या.
चाळीसगाव/पाचोरा/भडगाव या गिरणा परिसरात सकाळी अनेक ठिकाणी मतदान संथ गतीने झाले. दुपारनंतर हळूहळू मतदानाचा वेग वाढत गेला. अमळनेर/चोपडा/पारोळा या अनेर-बोरी परिसरात जिल्हा परिषदेच्या 14 गट व पंचायत समितीच्या 28 गणांसाठी सरासरी 63.31 टक्के मतदान झाले.
भुसावळ विभागात 62 टक्के मतदान
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भुसावळ विभागातील भुसावळसह रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यांमध्ये सरासरी 62 टक्के मतदान झाल़े रात्री उशिरार्पयत अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र होत़े
इव्हीएममध्ये बिघाड झाल्याने प्रशासनाने तातडीने ते बदलले. त्यामुळे काही वेळ प्रक्रिया थांबली.
भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील एका मतदान केंद्रावरील बुथ कर्मचा:यांनी जेवणासाठी जवळपास अध्र्या तासापेक्षा अधिक वेळ बंद केला होता. याबाबतची तक्रार गुढे-वडजी गटाचे रा.काँ. उमेदवार शकुंतलाबाई पुंडलिक पाटील व गुढे गण रा.काँ.च्या पं.स. उमेदवार सायजाबाई ओंकार पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. कर्मचारी संथगतीने काम करीत असल्याने चार-चार तास रांगेत राहूनही मतदान न होऊ शकल्याने काही मतदार माघारी फिरले, असेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या केंद्रावर सायंकाळी सातर्पयत मतदान सुरूच होते. मतदानासाठी आलेल्या सर्व मतदारांचे मतदान करून घेतल्याचे केंद्राधिका:यांनी सांगितले.