पालकमंत्री गेले कोठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 06:01 PM2020-07-20T18:01:57+5:302020-07-20T18:02:18+5:30
भाजपचा सवाल : खतटंचाईप्रश्नी घेराव घालण्याचा इशारा
धरणगाव--शहर व तालुका भाजपतर्फे युरीयासह मिश्र खतांचा काळाबाजार थांबवा, ज्वारी-मका शासकीय खरेदी केंद्र सुरु करा, शेतकऱ्यांचे वीज बील माफ करा, दुधाचे शासकीय खरेदीदर वाढवा आदी मागण्यासांठी भारतीय जनता पार्टीतर्फे बैलगाडी मोर्चा काढून रास्तारोको करण्यात आला.
पालकमंत्र्यांना घेराव
घालण्याचा इशारा
पालकमंत्रांच्या मतदार संघात शेतकऱ्यांना युरीया व इतर खतांसाठी हाल भोगावे लागत असल्याचा आरोप भाजपाच्या पदाधिकाºयांनी यावेळी केला. ज्वारी-मका खरेदी केंद्र सुरु न केल्यास व खते उपलब्ध न करुन दिल्यास पालकमत्र्यांना घेराव घालण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला,
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, सुभाष पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, तालुका अध्यक्ष अॅड. संजय छगन महाजन, शिरीष बयस यांच्या नेतृत्वाखालीे करण्यात आलेल्या आंदोलनाने छत्रपती शिवाजी चौक गजबजला होता. यामुळे सोशल डिस्टिन्सिंगचा फज्जा उडला.
यावेळी सर्व मान्यवरांनी सरकारवर टिका करुन सरकारचा निषेध नोंदविला. पालकमंत्री गेले कुठे असा सवाल उपस्थित केला. यादरम्यान नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करु असा ईशारा देण्यात आला.
गटनेते कैलास माळी यांनी प्रास्ताविक केल. सदर जनआंदोलन प्रसंगी शेतकरी बांधव, कृऊबाचे माजी सभापती पुनीलाल महाजन, अॅड. वसंतराव भोलाणे , शेखर पाटील, सुनील वाणी, माजी उपनगराध्यक्ष मधुकर रोकडे , नगरसेवक ललीत येवले, शरद धनगर, गुलाब मराठे, भालचंद्र माळी, कडू बयस, दिलीप महाजन, सुनील चौधरी, भास्कर मराठे, प्रल्हाद पाटील, कडू महाजन, कांतीलाल माळी, रामचंद्र मराठे, कन्हैया रायपूरकर, विजय महाजन, मिडिया प्रमूख टोनी महाजन, अनिल बडगुजर , मधुकर पाटील, राजु महाजन, सुदाम मराठे, शरद भोई, वासुदेव हरिनाथ महाजन, महेंद्र महाजन, दगा पाटील, सचिन पाटील, अमोल महाजन, रविंद्र मराठे, शुभम चौधरी, अनिल बडगुजर, विक्की महाजन, विकास चव्हाण, पिंटू कंखरे, विशाल महाजन, अमृत मराठे, सदाशिव महाजन, राजाराम महाजन, रतीलाल महाजन, गुलाब धनगर, राजू धनगर, विशाल मराठे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.