लग्न असो की अंत्ययात्रा फुलं मात्र या गावाचीच

By विलास.बारी | Published: December 5, 2017 03:18 PM2017-12-05T15:18:20+5:302017-12-05T15:40:20+5:30

फुलशेतीमुळे जळगाव जिल्ह्यातील या गावाचे बदलले अर्थकारण

Whether it is a wedding or a funeral flowers, this village is the only one | लग्न असो की अंत्ययात्रा फुलं मात्र या गावाचीच

लग्न असो की अंत्ययात्रा फुलं मात्र या गावाचीच

Next
ठळक मुद्देशिरसोली परिसरात भ्रमंतीदरम्यान कास पठाराची अनुभूतीलग्न असो की अंत्ययात्रा फुलं मात्र शिरसोलीचेचफुलशेतीमुळे बदलले गावाचे अर्थकारण

विलास बारी
जळगाव,दि.५ : मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध प्रकारचे संस्कार करण्यात येत असतात. प्रत्येक संस्कारासाठी काही विधी ठरवून दिले आहेत त्यात फुलं ही अविभाज्य भाग असतात. एखाद्या ठिकाणी अंत्यसंस्कार असो किंवा विवाह समारंभ या ठिकाणी जळगावपासून अवघ्या १४ किलोमिटर अंतरावर असलेल्या शिरसोली या गावातील विविध रंगी फुले ही हमखास असतात. फुलशेतीमुळे या गावाचे अर्थकारण बदलून गेले आहे.

७० टक्के शेतकऱ्यांचा फुलशेती व्यवसाय
जळगावपासून काही अंतरावर असलेल्या शिरसोली गावातील एकुण क्षेत्रापैकी तब्बल ७० टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी फुलशेती सुरु केली आहे. रोख आणि हमीचे पिक असल्याने शेतकऱ्यांकडून शेवंती, झेंडू, लिली, नवरंग, तेरडा, गुलाब, निशिगंध, जरबेरा, मोगरा यासह विविध फुलांची लागवड केली जात आहे.

जळगाव, पुणे व नाशिकची बाजारपेठ
शिरसोलीच्या फुलांना जळगावसह पुणे व नाशिक याठिकाणी मोठी मागणी आहे. शहराच्या लगत असलेल्या या गावातील शेतकऱ्यांना फुलांची मोठी बाजारपेठ लाभली आहे. त्यामुळे थेट नाशिक व पुणे-मुंबईपर्यंत रोज संध्याकाळी स्वतंत्र वाहने किंवा लक्झरीमार्फत फुले पाठविण्यात येत असतात. एका एकरमध्ये दोन ते तीन लाखांचे उत्पन्न घेणारे अनेक शेतकरी या भागात आहेत.

फुलशेतीमुळे बदलले गावाचे अर्थकारण
३५ ते ४० हजार लोकसंख्या असलेल्या शिरसोली गावात ५५ टक्के बारी समाजाची वस्ती आहे. सुरुवातीला हा समाज नागवेलीची (विळ्याच्या पानाची) शेती करीत होता. मात्र पानतांड्यावर वारंवार येणारे रोग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटावर पर्याय म्हणून बारी समाज बांधव गेल्या दहा ते बारा वर्षांपासून फुलशेतीकडे वळले. हळूहळू बारी समाजासोबतच माळी, पाटील, मराठा पाटील समाजबांधवांनी देखील फुलशेतीकडे आपला मोर्चा वळविला. फुलशेतीमुळे गावाचे अर्थकारण बदलले आहे.

पहाटे तीन वाजता सुरु होते लगबग
फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची पहाटे तीन वाजेपासून शेतातील फुले तोडण्यासाठी लगबग सुरु होते. सकाळी सात वाजेपर्यंत फुले तोडून आणल्यानंतर चांगल्या व थोड्या हलक्या दर्जाच्या फुलांची वर्गवारी केली जाते. त्यानंतर ही फुले जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये भरणाऱ्या फुलबाजारात विक्रीसाठी आणले जातात. या ठिकाणी प्रत्येक उत्पादकाने कोणत्या आडत्याकडे फुले द्यावे हे ठरलेले असते. ज्या शेतकºयांना पुणे, मुंबई किंवा नाशिक येथे फुले पाठवायची असतात ते मजुरांच्या माध्यमातून दिवसभर फुले तोडून लक्झरी किंवा स्वतंत्र वाहनातून रात्री फुले रवाना केली जातात.

शिरसोली परिसरात भ्रमंतीदरम्यान कास पठाराची अनुभूती
शिरसोली परिसरात शेतांमध्ये फेरफटका मारल्यानंतर लांबपर्यंत फुलांची शेती आढळून येते. विविधरंगी आणि विविध जातीची फुले पाहिल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कास पठाराची अनुभूती याठिकाणी येत असते. विविध जातींच्या गुलाबासह येथील शेतकऱ्यांनी जरबेरा, कार्निशिया यासारख्या थंड वातावरणात वाढीस लागणाऱ्या फुलांची देखील शेती सुरु केली आहे.

लग्न असो की अंत्ययात्रा फुलं मात्र शिरसोलीचेच
जळगावात विविध सभा, समारंभ तसेच सजावटीसाठी शिरसोलीच्या फुलांचा वापर केला जातो. एखाद्या कुटुंबात विवाह असला तरी अंत्यसंस्कार असले तरी या गावातील फुलांचा वापर होत असतो. शिरसोलीसह पाळधी, वावडदे, जळके,पाळधी या गावांमध्ये देखील फुलांची लागवड करण्यात येत असते.

Web Title: Whether it is a wedding or a funeral flowers, this village is the only one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.