दोनपैकी कोणती लस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:00+5:302021-01-09T04:13:00+5:30

शासन कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लसी घेणार आहेत. मात्र, यातील जळगावात नेमकी कोणती येणार हे अद्याप स्पष्ट नसल्याची माहिती ...

Which of the two vaccines? | दोनपैकी कोणती लस?

दोनपैकी कोणती लस?

Next

शासन कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लसी घेणार आहेत. मात्र, यातील जळगावात नेमकी कोणती येणार हे अद्याप स्पष्ट नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. दरम्यान, सर्वच केंद्रांवर शांतते व सुरळीत ड्राय रन पार पडला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी माहिती वरिष्ठ पातळीवर कळविल्याचेही त्यांनी सांगितले.

धामणगावला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाहणी केली. यावेळी नोड अधिकारी तथा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्यासह प्रमुख उपस्थित होते. या ठिकाणीही प्रोटोकॉलनुसार ठरविलेल्या वेळेत हा ड्राय रन राबविण्यात आला. २५ कर्मचाऱ्यांना ही लस देण्याचा डेमो देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माहिती जाणून घेतली. जळगाव जिल्हा प्रशासन कोरोना लसीकरणासाठी सज्ज आहे. या सज्जतेचा एक भाग म्हणून आज जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली असून, ती यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Which of the two vaccines?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.