दात घासताना तरूणाच्या ब्रश घशात गेला, ‘एक्स-रे’त दिसेचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 10:41 PM2021-05-30T22:41:56+5:302021-05-30T22:42:59+5:30

१८ वर्षांच्या तरुणाच्या घशात दात घासताना सहा इंचाचा ब्रश घशात गेला. काही केल्या तो निघेना, एक्सरेत पण दिसेना. दुर्बीण टाकून तो दिसला.

While brushing his teeth, the young man's brush went down his throat, X-ray | दात घासताना तरूणाच्या ब्रश घशात गेला, ‘एक्स-रे’त दिसेचना

दात घासताना तरूणाच्या ब्रश घशात गेला, ‘एक्स-रे’त दिसेचना

googlenewsNext
ठळक मुद्देमहत्प्रयासाने बाहेर काढण्यात यश.

लोकमत न्यूज नेटवर्क

कासोदा, ता. एरंडोल : येथील  १८ वर्षांच्या तरुणाच्या घशात दात घासताना सहा इंचाचा ब्रश घशात गेला. काही केल्या तो निघेना, एक्सरेत पण दिसेना. दुर्बीण टाकून तो दिसला. महत्प्रयासाने काढल्यावर तरुणाचा जीव वाचला. 

कासोदा येथील शेजवळकर या उपनगरात लालचंद पांचाळ हे पत्नी, एक मुलगा व एक मुलगीसह परंपरागत पांचाळ काम करून  आपला संसार चालवितात.  दि. २८ मे रोजी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे त्यांचा १८ वर्षांचा मुलगा मयूर हा दात घासल्यानंतर जीभ स्वच्छ करीत असतानाच दात घासण्याचा ब्रश अचानक त्याच्या घशात गेला. तो ब्रश बाहेर ओढत होता; पण ब्रश काही केल्या बाहेर न येता घशात आतच  जात होता. अखेर ब्रश घशात लांबपर्यंत गेलाच.  ही घटना त्याने आई-वडिलांना सांगितली. तातडीने गावातील डॉक्टरांकडे त्याला नेले. त्यांनी वेदनाशामक उपचार करून ताबडतोब जळगावला नेण्याची सूचना केली.

जळगाव येथे डॉ. दातार यांना दाखविल्यानंतर त्यांनी  डॉ. ऋषिकेश चौधरी यांच्याकडे पाठविले. डॉक्टरांनी सविस्तर माहिती विचारली व घशाचे एक-दोन नव्हे, तीन एक्सरे काढले. परंतु, ब्रश काही दिसत नव्हता. शेवटी दुर्बीण टाकून हा ब्रश दिसला.  विशेष दुर्बीणद्वारे हा ब्रश काढण्यात आला.

स्पेशल दुर्बिणीव्दारे काढला ब्रश

१८ सेंटिमीटरचा हा ब्रश होता. प्लास्टिक एक्सरेत दिसत नाही, त्यामुळे स्पेशल दुर्बीणद्वारे त्याला काढण्यात आले. तिशय नाजूक व आतील भागात इजा न होऊ देता तो काढणे हे जास्त जिकिरीचे होते. फ्लेक्झिबल इंडोस्कोपीद्वारे पाहून त्याद्वारे ऑपरेट केले, अशी माहिती डॉ. चौधरी यांनी दिली.

Web Title: While brushing his teeth, the young man's brush went down his throat, X-ray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.