दारू विकताना एकास अटक
By admin | Published: April 10, 2017 12:50 AM2017-04-10T00:50:20+5:302017-04-10T00:50:20+5:30
वढोदा : चार हजार 400 रुपयांची देशी दारू जप्त
मुक्ताईनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य महामार्गावरील दारू दुकाने सील करण्यात आल्यानंतरही तालुक्यातील वढोदा येथील देशी दारू दुकानाच्या आवारात दारूविक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एकास रविवारी सायंकाळी अटक करण्यात आली़
जिल्हाधिका:यांकडे आलेल्या तक्रारीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात चार हजार 400 रुपयांच्या देशी दारूसह आरोपी देवीदास एकनाथ झाल्टे यास अटक करण्यात आली़
31 मार्चच्या मध्यरात्रीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्ग व राज्य महामार्गावरील दारू दुकाने सील करण्यात आली आहेत. वढोदा येथील परवानाधारक देशी दारू दुकानदार यू. आर.पवार यांचे दुकानदेखील सील करण्यात आले होते. त्यानंतरही पवार स्वत: त्यांचे माणसांकरवी सीलबंद दुकानाच्या मागे दारूविक्री करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आली होती.
जिल्हाधिका:यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सी.पी. निकम, एम.पी.पवार, जी.बी. इंगळे, सहा. निरीक्षक एच.एल. ब्राrाणे, वाय.आर. जोशी, विजय परदेशी, नीलेश मोरे यांच्या पथकाने वढोदा येथे सीलबंद देशी दारू दुकानाच्या आवारात छापा टाकला. आरोपी देवीदास झाल्टे हा दुकानाच्या आवाराच्या पाठीमागे देशी दारूविक्री करीत असताना आढळून आला. पवार यांच्या शेतातील गोडावूनचीदेखील तपासणी झाली, मात्र काहीही आढळून आले नाही़