तोंडापूरच्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:17 AM2021-09-21T04:17:47+5:302021-09-21T04:17:47+5:30
तोंडापूर, ता.जामनेर : येथे रात्री मुसळधार पाऊस झाल्याने कापूस ओला होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तोंडापूर व ...
तोंडापूर, ता.जामनेर : येथे रात्री मुसळधार पाऊस झाल्याने कापूस ओला होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तोंडापूर व परिसरात सुरुवातीपासून बऱ्यापैकी पाऊस होता. यामुळे शेती पिकांची वाढही चांगल्या प्रकारे झाली होती. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांचे उत्पादन चांगले होणार असल्याने समाधानाचे वातावरण होते. मात्र, कापसाचे हे उत्पादन घरात येण्यास काही दिवस बाकी असताना रविवारी रात्री झालेल्या पावसाने घात केला. पांढरे सोने म्हटले जात असलेल्या या पिकाचे अचानक झालेल्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. चांगली किंमत देणारा कापूस पावसाने भिजल्याने मातीमोल भावात विकला जाणार आसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
---
२१सीडीजे१
यागोदरही पावसाआभावी उडीद, मूग, चवळी ही पिके पाण्याअभावी नष्ट झाली आणि आता तोंडी आलेला घास रात्रीच्या पाण्याने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.