हाक मारी जीव कुणाला...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:57 AM2018-08-13T00:57:30+5:302018-08-13T00:58:32+5:30

धरणगाव येथे बालकवींच्या स्मारकाची आजची स्थिती

Who are you? | हाक मारी जीव कुणाला...?

हाक मारी जीव कुणाला...?

googlenewsNext


धरणगाव, जि.जळगाव :
काय पाहिजे मिळवायला ?
कुणीकडे हा झुकतो वारा
हाक मारी जीव कुणाला ...?
बालकवींच्या ‘उदासीनता’ या कवितेतील काव्यपंक्ती त्यांच्या जीवनातील उग्दिन्नता, दु:ख स्पष्ट करतात. त्यांच्या जीवनात आलेली उदासिनता त्यांच्या साकारल्या जाणाऱ्या स्मारकाबद्दल ही त्यांना व साहित्यिकांना शासनाच्या धोरणामुळे आलेली दिसते.
बालकवींनी ज्या भूमीत जन्म घेतला त्या भूमित साकारले जाणारे स्मारक गेल्या पाच-सहा वर्षापासून अर्धवट अवस्थेत निधी अभावी रखडले आहे. माजी पालकमंत्र्यांनी मुहूर्तमेंढ रोवलेल्या या स्मारकाचे काम सहकार राज्यमंत्र्यांनी तडीस न्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
१३ आॅगस्ट १८९० मध्ये धरणगावला जन्मलेल्या बालकवींची काव्या प्रतिभा याच भूमित फुलली.
त्यांच्या पारवा, औदुंबर, श्रावणमासी, आदी कवितामधील शब्दरूपाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य साहित्यिक व साहित्यप्रेमींना आजही लाभते औदुंबर कवितेतील औदुंबर आज कोलमोडलेला असला तरी काळा डोह ब्राम्हण तलाव, निसर्ग सौंदर्य आजही श्रावण मासात अनुभवायला मिळते.
स्मारकाचे अर्धवट काम...
साहित्य कला मंच या संस्थेच्या पाठपुराव्यामुळे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सन २०१०-११ मध्ये बालकवींच्या स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली. दोन एकर गावठाण जागेत बालकवींचे स्मारक उभारण्याचे काम त्यांनी हाती घेतले.
स्मारकाच्या सरक्षक भिंतीसाठी ५५ लाख निधी जिल्हा नियोजन मंडळातर्फे मंजूर संरक्षक भिंत व भव्य प्रवेशद्वार उभारले. दुर्देवाने पुढचे काम निधीअभावी रखडले आहे.
५ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव प्रलंबित
स्मारकाचा संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराच्या नंतर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मारकाचा आराखडा तयार करून सन २०१२-१३ मध्ये पुढील कामासाठी ५ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाची दखल अद्याप घेतली गेलेली नाही. त्यामुळे बालकवींचे स्मारकाचे काम रखडले आहे.
स्मारक होणार साहित्यिकांची पंढरी
निसर्ग कवी बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे स्मारक साकारले गेल्यास हे स्मारक साहित्यिकांची ‘पंढरी’ म्हणून नावारूपाला येईल. येथे विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातील. स्मारक झाल्याशिवाय कवितांची कार्यशाळा, बालकवी साहित्य संशोधन केंद्र, आदी उपक्रम सुरू होणार नाही. तसेच कोलमडलेला ‘औंदुबर’ या स्मारकाच्या ठिकाणी नव्याने उभारण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Who are you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.