कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:43+5:302021-06-11T04:11:43+5:30

शिक्षकांना ५० लाखांची भरपाई द्यावी शिक्षक सेनेने केली निवेदनाद्वारे मागणी भुसावळ : कोरोनासंदर्भात कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या शिक्षकांना ५० ...

Who died of corona | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या

Next

शिक्षकांना ५० लाखांची भरपाई द्यावी

शिक्षक सेनेने केली निवेदनाद्वारे मागणी

भुसावळ : कोरोनासंदर्भात कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या शिक्षकांना ५० लाखांची भरपाई द्यावी, अशी मागणी शिक्षक सेनेने केली आहे.

याबाबत सेनेने दिलेली माहिती अशी की, कारोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेता ‘कोरोनाची ड्यूटी’ करताना शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील शिक्षक संभ्रमित होते. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिक्षकसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड यांनी कोरोना काळात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लस देण्याची मागणी केली आणि प्रशासनाने ती मान्य केली. तांत्रिक मुद्दे पुढे करून लस देणे टाळत असलेल्या प्रशासनाला प्रा. गायकवाड यांनी चांगलेच धारेवर धरले होते. रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सर्व आरोग्य केंद्र आणि सर्वेक्षणाला नेमलेले शिक्षक, कोविड सेंटरवर, चेक पोस्ट, लसीकरण केंद्र या ठिकाणी शिक्षक आज फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करत आहेत. प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे शिक्षकांचे काही जिल्ह्यांत बळी गेले आहेत. विमा कंपनी प्रत्यक्ष रुग्णांशी संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देते. मग शिक्षक या सर्व ठिकाणी काम करताना संपर्कात येत नाही काय, प्रत्यक्ष संपर्कात विमा लाभ मिळणार नाही का? मग अशा प्रकारे बळी गेलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याचे काय, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी हमी दिली जाते. लस देण्याबाबत सकारात्मकता दाखवली जाते; परंतु प्रत्यक्षात काम करत असताना मात्र सुरक्षिततेविषयी सोयी-सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे अनेक शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. अशा शिक्षकांच्या परिवाराला ५० लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे गायकवाड यांनी केली आहे.

Web Title: Who died of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.