जळगावचा खासदार कोण?, मतदारांमध्ये उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:50 PM2019-04-23T12:50:15+5:302019-04-23T12:51:24+5:30
राजकीय पक्षही तयारीत
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातून १४ उमेदवार नशीब आजमावत असून त्यात भाजप-शिवसेना युतीचे उन्मेष पाटील, काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे गुलाबराव देवकर, वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर हेदेखील रिंगणात आहेत. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी ६ वाजता मतदान पूर्ण होईल. या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी झाली असून मतदान कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत.
मतदानामुळे एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना उन्हाळ््याच्या चटक्यांमध्येदेखील वाढ झाली आहे. सोमवारी शहराचे कमाल तापमान ४०.८ अंशांवर गेले होते. मंगळवारी दुपारपर्यंत तापमान ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.
एकूण मतदार - १९,२५,३५२
पुरुष मतदार- १०,०८,८१८
महिला मतदार- ९,१६,४७०
तृतीयपंथी - ६४
मतदान केंद्र -२,०१३
मतदारांसाठी - २६८९ व्हीव्हीपॅट