कांदा उत्पादकांचा वाली कोण? पंचनामे होईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 07:16 PM2019-11-09T19:16:04+5:302019-11-09T19:16:34+5:30
नशिराबाद : खरीप पिकांचे पंचनामे होत असले तरी कांदा, फळभाज्या उत्पादक त्यापासून लांबच आहे. शासनाच्या निर्देशानुसार उभ्या पिकांचे पंचनामे ...
नशिराबाद : खरीप पिकांचे पंचनामे होत असले तरी कांदा, फळभाज्या उत्पादक त्यापासून लांबच आहे. शासनाच्या निर्देशानुसार उभ्या पिकांचे पंचनामे होत असले मग यांचे पंचनामे का नाही असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांकडून होत आहे.
रोगाचा प्रादुर्भाव झाला तर काही ठिकाणी पिके करपली. बुरशीजन्य रोग वाढले. शासनाकडून शेतात उभ्या पिकांचे पंचनामे होत असल्याचा सांगितले जाते.
मात्र फळभाज्या कांदा यांचे पंचनामे अद्याप झालेले नाही. फळभाज्या उत्पादकांना न्याय मिळावा सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी सरपंच पंकज महाजन यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
-अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
-सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, कापूस यांसह फळभाज्या, कांदे यांचे नुकसान झालेले आहे.
-गतवर्षी दुष्काळ तर यंदा संततधार पावसाने शेतकºयाने हवालदिल केले आहे.
-नशिराबाद परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. पावसाच्या सततच्या वर्षावाने शेतातच कांद्याचे उभे पीक सोडलं.