..किती बळी जाणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:15 PM2019-05-30T13:15:34+5:302019-05-30T13:15:54+5:30
जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर दर दिवसाआड एक अपघात घडत आहे अन् निरपराधांचा बळी जात आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहुन ...
जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर दर दिवसाआड एक अपघात घडत आहे अन् निरपराधांचा बळी जात आहे. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहुन मन ‘सुन्न’ होत असते. अपघाताच्या या घटनांमुळे महामार्गावरून दररोज वापर करणाऱ्या हजारो विद्यार्थी, नागरिक व महिलांना जीव मुठीत घेऊन जावे, यावे लागते. शासनाने दहा वर्षांपूर्वी मलकापूर ते धुळे हा रस्ता चौपदरी करण्याचे जाहीर केले होते. तसेच या मार्गावर बायपास रस्त्यांच्या ठिकाणी वळण रस्ते तयार करण्याचे शासनाचे नियोजन होते. मात्र, त्यावेळची ही घोषणा कागदावरच राहिली. जर दहा वर्षापूर्वी हे काम झाले असते, तर आज निरपराधांचे बळी गेले नसते. हा समांतर रस्ता होण्यासाठी गेल्या दहा वर्षांत अनेक आंदोलने, मोर्च व उपोषण झालीत. समांतर रस्ता कृती समितीनेंही यासाठी मोठा पुढाकार घेतला. आमच्या व्यापारी बांधवांनीदेखील व्यवसाय बंद ठेऊन, या आंदोलनात सहभाग घेतला. जळगावकरांचा आवाज जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचविला. ऐवढे करुनही समांतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही.
आता जळगावकर या नात्याने ऐवढीच अपेक्षा की, लोकप्रतिनिधींनी जळगावकरांचा जीव वाचविण्यासाठी समांतर रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अजून किती बळी जाणार ,याची वाट पाहू नये.
-पुरुषोत्तम टावरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट (महाराष्ट्र)