कौन बनेगा करोडपतीत जळगावचे डॉक्टर लखपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:24+5:302021-07-19T04:12:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कौन बनेगा करोडपतीच्या ऑनलाईन प्रश्नमंजुषेत हजारो प्रेक्षकांमधून अचूक आणि वेगाने उत्तरे देऊन डॉ. हेमंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कौन बनेगा करोडपतीच्या ऑनलाईन प्रश्नमंजुषेत हजारो प्रेक्षकांमधून अचूक आणि वेगाने उत्तरे देऊन डॉ. हेमंत पाटील यांनी बाजी मारली आहे. त्यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस या स्पर्धेत जिंकले आहे.
डॉ. हेमंत पाटील हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. ५ जुलै रोजीच्या या शोमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तिकडे हॉट सीटवरील स्पर्धकांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची ऑनलाईन अचूक व अगदी वेगात जो प्रेक्षक उत्तर देईल, त्याला बोनस मिळत जातो. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी सर्व प्रेक्षकांमधून दहा प्रेक्षकांची निवड करून, जो अचूक व अगदी वेगात उत्तरे देईल त्याला एक लाखाचे, तर अन्य ९ स्पर्धकांना प्रत्येकी ५ हजारांची बक्षिसे दिली जातात.
डॉ. हेमंत पाटील यांनी आवड म्हणून व अभ्यास म्हणून यात सहभाग नोंदविला. ५ जुलै रोजी झालेल्या एपिसोडची त्यांनी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. ६ जुलैला त्यांचे नाव चॅनलवर व ॲपवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात देशभरातून स्पर्धक सहभागी होत असतात, असे डॉ. पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.