अस्वच्छतेकडे कोणी लक्ष देईल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:15 PM2019-06-07T12:15:50+5:302019-06-07T12:16:33+5:30

अस्वच्छतेचा प्रश्न बिकट

Who will pay attention to indebtedness? | अस्वच्छतेकडे कोणी लक्ष देईल का ?

अस्वच्छतेकडे कोणी लक्ष देईल का ?

Next

शहरात अस्वच्छतेचा प्रश्न बिकट बनला असून त्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव नेहमीच शहरवासीयांना येतो. काही ठिकाणी कचरा कुंड्या नाही तर जेथे आहे त्या ओसंडून वाहत आहे. या सोबतच बऱ्याच ठिकाणी कचरा कुंड्या असल्या तरी त्यात कचरा न टाकता अनेक जण बाहेर टाकतात व तो इतरत्र उडतो. त्यामुळे अस्वच्छतेचा प्रश्न बिकट होतो. असे असले तरी शहरातील शिवाजीनगर भागात ही समस्या गंभीर होत आहे. या परिसरात असलेल्या अस्वच्छतेबाबत नेहमी आवाज उठविला जाते. त्या बाबत मनपाकडे तक्रारही केली जाते. यात यंदाही आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून ही समस्या मांडली. हा प्रश्न ५ ते १० हजार नागरिकांचा असून तो खूप गांभीर्याने घेण्यासारखा असला तरी त्याकडे मनपा सोयीस्करपणे दुर्लक्ष करते. यामुळे शिवाजीनगर भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीतील पाणी हे रस्त्यावरून येवून कोणत्यातरी खड्यात साचून त्यामध्ये डास तयार होतात व त्यामुळे थंडी-ताप, खोकला, मलेरिया अशा प्रकारचे आजार पसरतात. त्या विषयी यापूर्वीदेखील नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र त्याची कोणीच दखल घेतली नाही. मनपाचा आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्प गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. तरीही त्या ठिकाणी शहरातील दररोजचा २२० टन कचरा टाकला जात आहे. लाखो टन कचरा कुठल्याही प्रक्रि येविना पडून आहे. त्या ठिकाणी जसा आजूबाजूला त्रास आहे, तसाच त्रास या भागात सहन करावा लागतो. शिवाजीनगर भागात काही ठिकाणी कचराकुंडीच नाही. त्यामुळे कचरा टाकावा कोठे असा प्रश्न पडतो. या सर्व प्रकाराची मनपाच्या आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे, तरच हा प्रश्न सुटू शकेल.
- विनायक पाटील, अध्यक्ष, धर्मरथ फाउंडेशन.

Web Title: Who will pay attention to indebtedness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव