मी सक्षम आहे तर बदल का स्विकारु?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:39+5:302021-02-10T04:16:39+5:30

जळगाव : आजच्या २१ व्या शतकात एक गंभीर समस्या समाजाला भेडसावत आहे, ती म्हणजे तरुणांचे लग्न जुळणे अगदी कठीण ...

Why accept change if I am able? | मी सक्षम आहे तर बदल का स्विकारु?

मी सक्षम आहे तर बदल का स्विकारु?

Next

जळगाव : आजच्या २१ व्या शतकात एक गंभीर समस्या समाजाला भेडसावत आहे, ती म्हणजे तरुणांचे लग्न जुळणे अगदी कठीण झाले आहे. नशिबाने किंवा कर्तृत्वाने जुळलेच तर ते पुढे टिकविणे त्यापेक्षाही अवघड झालेले आहे. बदलती मानसिकता हे त्याचे मुख्य कारण असून त्यामुळेच समाजात घटस्फोटाचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षात पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षात पती-पत्नीच्या वादाची तब्बल ८०४ प्रकरणे आली होती.

आजच्या परिस्थितीत मुली व मुले उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत, त्यामुळे मी सक्षम आहे तर मी का म्हणून सहन करायचे ही मानसिकता मुलींमध्ये रुजत चालली आहे. त्याशिवाय पती असलेला मुलगा देखील मीच का बदल स्वीकारु, या भुमिकेत असतो. एकमेकांच्या अहंकारामुळे नातेवाईकांमध्ये देखील तणावाच्या घटना घडल्या आहेत. टीव्ही, मोबाईल, सोशल मीडियाचा अती वापर घातक ठरु लागला आहे. त्यामुळे पती-पत्नीत गैरसमज व संवाद कमी होत चालला आहे. पती-पत्नीत विचार पटत नसतील तर तात्काळ वेगळे होण्याचा घाईचा निर्णय घेतला जातो.

पालकांचा हस्तक्षेप घातक

मुलीला सासरी तिच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, माहेरी लाडात होती, तेथेही लाडात असावी, तिला हवं तसं करता, वागता यावे ही मुलीच्या आईची इच्छा व त्यांचा हस्तक्षेप घटस्फोट व वादाला कारण ठरत आहे. दुसरीकडे लग्न झाल्यामुळे मुलगा आपल्यापासून दूर तर नाही ना जाणार या शंका व शक्यतेमुळे संसार व बारीकसारीक गोष्टीत मुलाच्या आई, वडिलांचाही हस्तक्षेप होत आहे. त्याशिवाय एकमेकांबाबत गैरसमज, संशय, व्यसन व दुसऱ्याला त्रासदायक असणाऱ्या सवयी यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

संसार टिकण्यासाठी काय करावे

पती-पत्नीने एकमेकांना दाद देणे, कौतूक करणे या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत, पटल्या नाहीत तर योग्य शब्दात मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. तू माझ्या आई, वडिलांशी व्यवस्थित बोलली नाही म्हणून मी पण बोलणार नाही ही एकमेकांमधील स्पर्धा टाळली पाहिजे. मीच का बदलावे हा अंहकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वत:मध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी. अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरी देखील किरकोळ मतभेद व दोषांसहित आपल्याला त्याला स्वीकारता येईल का याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे.

पती-पत्नीच्या वादाचे ८०४ प्रकरणे

पोलीस दलातील महिला सहाय्य कक्ष पती-पत्नीतील वादावर तोडगा काढण्याचे मुख्य कार्य करते. या कक्षात २०२० मध्ये ८०४ पती-पत्नींच्या वादाची प्रकरणे आली होती, त्यात १८८ प्रकरणांमध्ये संसाराची वेल पुन्हा बहरण्यात मोलाची कामगिरी या कक्षाच्या पथकाने केली आहे. ३९८ प्रकरणे तारखेवर हजर न होण्यामुळे निकाली काढण्यात आली होती, अर्थात या प्रकरणात घटस्फोट झाला. तर उर्वरित प्रकरणात तडजोडीचे प्रयत्न सुरुच होते.

कोट...

कोणत्याही जोडप्यात वाद होताताच, पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्विकारली तर वाद टोकाला जात नाही. आपल्याला हवे तसे कधीच मिळत नाही पण जे मिळाले ते मनापासून स्वीकारले तर कौटुंबिक नाते टिकवता येते.

-शंभू संतोष रोकडे, संचालक, राष्ट्रीय परिट वधू वर परिचय.

Web Title: Why accept change if I am able?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.