सर्वांना निधी दिला मग् नाराज कशासाठी? , जळगाव जि.प. अध्यक्षांचे पती मच्छिंद्र पाटील यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:10 PM2018-03-07T13:10:59+5:302018-03-07T13:10:59+5:30
नाराजांनी समोर यावे
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ७ - जिल्हा परिषद अध्यक्षांबाबत कुणी नाराज होण्याचे कारण नाही, कारण सर्वांना आपल्या गटासाठी निधी व कामे दिलेली आहेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येतो कुठे? कोणते सदस्य नाराज आहे, त्यांनी समोर यावे, असे आवाहन करीत समाधानी कोणीच नसते, असेही जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांचे पती मच्छिंद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जि.प. अध्यक्ष बदलासंदर्भात सुरू असलेल्या हालचालीबाबत आपणास काहीच माहित नाही, मात्र जि.प. अध्यक्षा कार्यालयात थांबत नसल्याचे जे आरोप करतात त्यांनी पक्षशिस्त काय आहे, हे समजून घ्यावे.
खरे कोण, खोटे कोण?
जि.प. अध्यक्षा कोठे लग्न समारंभास गेल्यातरी त्या दुपारी आपल्या दालनात असतात. दररोज संध्याकाळी पत्रकारही त्यांना भेटतात. त्यामुळे त्या वेळ देत नाही, असे म्हणाणारे खरे की खोटे, हे तुम्हीच ठरवा, असेही मच्छिंद्र पाटील म्हणाले. आरोप करणे चुकीचे नाही, मात्र आरोप करताना पक्षशिस्त काय आहे, हे समजून घ्यावे, असा चिमटाही त्यांनी काढला.
बसून चर्चा करावी
अध्यक्षा झाल्या म्हणून त्यांनीच सर्व निर्णय घ्यावे का, असा सवाल करीत मच्छिंद्र पाटील म्हणाले की, महिला अध्यक्षा आहे, त्या महिला सदस्यांनीही एकत्र यावे, बसून चर्चा करावी. पक्षाकडे यावे, तेथे चर्चा करावी, असा सल्लाही पाटील यांनी दिला.
त्यांच्या इच्छेनुसार सर्व काही कसे होणार?
आरोप करणाºयांना त्यांच्या पद्धतीने सर्व पाहिजे, हे शक्य नाही, असे पाटील म्हणाले. काम करण्याची भरपूर इच्छा आहे व करीतही आहे, मात्र चौकटीबाहेर जावून तर काम करू शकत नाही, असेही ते म्हणाले.