गिरीश महाजन यांचे नाव नसतानाही त्यांचा बचाव का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:34+5:302020-12-08T04:13:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव-माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव तपास यंत्रणेने अथवा अधिकृतपणे घोटाळ्यात असल्याचे जाहीर झालेले नाही. तरी ...

Why defend Girish Mahajan without his name? | गिरीश महाजन यांचे नाव नसतानाही त्यांचा बचाव का ?

गिरीश महाजन यांचे नाव नसतानाही त्यांचा बचाव का ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव-माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव तपास यंत्रणेने अथवा अधिकृतपणे घोटाळ्यात असल्याचे जाहीर झालेले नाही. तरी देखील गिरीश महाजन यांचा बचाव भाजपचे जिल्हाध्यक्षांना का करावा लागत आहे ? असा प्रश्न शिवसेनेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा शहराचे आमदार सुरेश भोळे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याशी तसेच वॉटरग्रेसच्या प्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन यांचा संबंध नसल्याचा खुलासा द्यावा लागला. मात्र याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे. त्या तपासात अद्यापही गिरीश महाजन यांचे नाव समोर आलेले नाहीत किंवा अधिकृत यंत्रणेने त्यांचा हात असल्याचे देखील जाहीर केलेले नाही. असे असताना सुद्धा भाजपच्या जिल्हाध्यक्षांना गिरीश महाजन यांचा खुलासा करून बचाव करावा लागणे याचा अर्थ नागरिकांनी काय धरावा असेही प्रशांत नाईक यांनी म्हटले आहे.

त्या महिला वकिलांचे नाव जाहीर करा

सागर पार्कप्रकरणी महाविकास आघाडीने १०० कोटी रुपयांची सुपारी घेतली असा गंभीर आरोप केला आहे. त्यासाठी आयुक्तांच्या दालनात रोज एक महिला वकील भेटुन जाते असे म्हटले आहे. मग त्या महिला वकिलाचे नाव का जाहीर करीत नाही ? जे काही आहे ते पुराव्यानिशी आणि पूर्ण नावे घेऊन आमदारांनी बोलावे, लपवाछपवीचे राजकारण करून नागरिकांची दिशाभूल करू नये असे खुले आव्हान प्रशांत नाईक यांनी दिले आहेत.

Web Title: Why defend Girish Mahajan without his name?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.