प्रत्येक वेळी राजकीय वशिल्याची गरज का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:59+5:302021-05-24T04:15:59+5:30
कोट आमच्याकडे इंजेेक्शनचा स्टॉक नसल्यानेच नाही, असे सांगितले अन्यथा इंजेक्शन आहे आणि आम्ही देणार नाही, असे शक्य नाही. याआधी ...
कोट
आमच्याकडे इंजेेक्शनचा स्टॉक नसल्यानेच नाही, असे सांगितले अन्यथा इंजेक्शन आहे आणि आम्ही देणार नाही, असे शक्य नाही. याआधी आम्ही इंजेक्शन उपलब्ध असल्याने शेकडो रुग्णांना ते दिले आहे. काहींना दाखल करून उपचार केले आहेत. आमच्याकडेही जिल्हा रुग्णालयातूनच या इंजेक्शनचा पुरवठा होतो.
- डॉ. प्रमोद भिरूड, प्रशासकीय अधिकारी, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय
कोट
मला सकाळी एका पदाधिकाऱ्यांचा फोन आला की, मुलाला कुत्र्याने चावा घेतला आहे. त्याला कुठे दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे मी त्यांना तातडीने घेऊन या, असे सांगून मुलाला दाखल करून उपचार सुरू केले. मुलाची प्रकृती स्थिर आहे. सुरुवातीला मुलगा जेव्हा आला तेव्हा त्याला कोविड हॉस्पिटल असल्याने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पाठविले होते. नंतर आमच्याकडे आम्ही दाखल करून घेतले.
- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, जीएमसी.