जिल्हा बँकेच्या चेअरमनवर का नाही गुन्हा?

By Admin | Published: March 7, 2017 11:30 PM2017-03-07T23:30:37+5:302017-03-07T23:30:37+5:30

प्रीती मेनन यांचा सवाल: केवळ प्रसिद्धी व त्रास देण्यासाठी माझ्याविरुद्ध दाखल केला खटला

Why is not the case of the district bank chairman? | जिल्हा बँकेच्या चेअरमनवर का नाही गुन्हा?

जिल्हा बँकेच्या चेअरमनवर का नाही गुन्हा?

googlenewsNext

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एका शाखेत ७३ लाखांच्या जुन्या नोटाबदली प्रकरणी सीबीआयने बँकेच्या कार्यकारी संचालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीबीआयने या कारवाईत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या व जिल्हा बँकेच्या चेअरमन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल आम आदमी पार्टीच्या राज्य संयोजिका प्रीती मेनन यांनी केला आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल आहे. या खटल्याच्या कामकाजासाठी त्या मंगळवारी आल्या असता त्यांनी जळगावात ‘लोकमत’शी वार्तालाप केला. जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेची चौकशी झाली तसेच अन्य शाखांमध्ये काय झाले याची चौकशी कोण करणार ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
खटला केवळ त्रास देण्यासाठी
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत फोनवर बोलणे झाल्याचा आरोप हॅकर मनीष भंगाळे याने केला होता. त्यानंतर दोन आठवडे झाले तरी कारवाई न झाल्याने आपण कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे खडसे यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल केला होता. खटल्यातून काही निष्पन्न होणार नाही. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी व आपल्याला त्रास देण्यासाठी हा खटला दाखल केला आहे. त्यामुळे न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया जात असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे मंत्रीपद गेलं, त्याचीशी आम्हाला काही घेणं देणं नाही. ज्यांनी चूक केली आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे एवढेच आमचे म्हणणे आहे. मात्र भाजपा मंत्र्यांना तत्काळ क्लिन चिट देणाºया या सरकारकडून आम्हाला फार अपेक्षा नसल्याचे त्यांनी म्हटले.
भ्रष्टाचार केवळ मुंबई मनपामध्येच आहे का?
शिवसेना व भाजपा हे सत्तेत राहण्यासाठी काहीही करतात. शिवसेना म्हणते भाजपा भ्रष्टाचारी तर भाजपा म्हणते शिवसेना भ्रष्टाचारी आहे. दोन्ही पक्ष भ्रष्टाचारी आहेत तर शिवसेना व भाजपाची राज्यात व केंद्रात युती कशासाठी आहे. केवळ मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे का? राज्यात पारदर्शी कामकाज सुरू आहे का? असा सवाल त्यांनी केला.

 

Web Title: Why is not the case of the district bank chairman?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.