का पराभूत झाली मनु भाकर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:16 AM2021-07-26T04:16:41+5:302021-07-26T04:16:41+5:30
जेव्हा ६० शॉट्सच्या क्वालिफिकेशनला सुरूवात झआली तेव्हा मनु हीने चांगली सुरूवात केली. तीने ९८ पॉईंट्स हे पहिल्या दहा शॉट्समध्ये ...
जेव्हा ६० शॉट्सच्या क्वालिफिकेशनला सुरूवात झआली तेव्हा मनु हीने चांगली सुरूवात केली. तीने ९८ पॉईंट्स हे पहिल्या दहा शॉट्समध्ये मिळवले. १६ शॉट्सनंतर तीच्याकड़े १५६ गुण होते. मात्र तेव्हाच तिच्या पिस्तुलात समस्या निर्माण झाली. तीने त्याची माहिती प्रशिक्षक रोनक पंडित यांना दिली. त्यानंतर परिक्षकांनाही ते सांगितले गेले. पिस्तुलातील लिव्हर तुटले होते. त्यामुळे बॅरल बाहेर येत नव्हते. त्यामुळे तिला गोळ्या त्यात भरता येत नव्हत्या. परिक्षकांनी तिला दुसरी बंदुक वापरण्याची परवानगी दिली. प्रत्येक नेमबाज हा आपल्यासोबत एक अतिरिक्त बंदुक नेत असतो. मनु पुन्हा परतली तेव्हा तीने सहा मिनिटे गमावली होती. त्यामुळे तिच्या खेळावर त्याचा परिणाम झाला. तीने शानदार पुनरागमन केले. पुढच्या दहा शॉट्समध्ये तीने ९४ गुण मिळवले. मनुने १० शॉट्सच्या तीन सिरीजमध्ये ९४,९५ आणि ९८ गुण मिळवले. अखेरच्या सहा मिनिटात मनुला ७ शॉट्स लगावायचे होते. मात्र तिला वेळ कमी पडला. तिला अखेरचा शॉट हा ८ गुणांचा होता. आणि तेथेच तिचे अंतिम फेरीत पोहचण्याचे आव्हान संपुष्टात आले. मनु ५७५ गुणांसह १२ व्या स्थानी राहीली.