पतीच्या निधनानंतर काही तासात पत्नीचे निधन
By admin | Published: July 2, 2017 05:44 PM2017-07-02T17:44:30+5:302017-07-02T18:04:21+5:30
पाचो:यात एकाच दिवशी निघाली पती-पत्नीची अंत्ययात्रा
ऑनलाईन लोकमत
पाचोरा,दि.2 - पती-पत्नी हे सुखदु:खाचे भागीदार असतात. क्वचितच जोडप्यांची पूर्ण जीवनभर साथ एकमेकांना लाभते. सोबत तर जगलेच पण मृत्यूही जवळपास सोबतच आल्याची घटना 2 रोजी पाचोरा तालुक्यात घडली.
नाचणखेडा, ता पाचोरा येथील भावसिंग गणसिंग पाटील (वय 73) व अलकाबाई भावसिंग पाटील (वय 68) हे वृद्ध दाम्पत्य पाचोरा येथील जयकिसन सोसायटीत ब:याच वषार्पासून एकटेच राहत होते. 2 मुले नोकरी निमित्त बाहेरगावी असल्याने वृद्ध आजी -आजोबा एकमेकांना सहारा देत जीवन जगत होते
रविवारी पहाटे 2.30 वाजता काही दिवसांपासून किरकोळ आजाराने ग्रस्त असलेले भावसिंग गणसिंग पाटील यांचे निधन झाले. पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने काही तासातच म्हणजे दुपारी 4.30 वाजता कर्करोगाने आजारी असलेल्या अलकबाई भावसिंग पाटील यांचेही निधन झाले. दोघांचेही जीवापाड असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्य़क्त केली. दोघांनाही सोबतच अग्निडाग दिला.