पत्नी रुग्णालयात; घरात पती, मुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:01+5:302021-03-13T04:29:01+5:30
आदर्शनगरातील घटना : उपचारांना पैसे नसल्याने घेतला आत्महत्येचा निर्णय जळगाव : दवाखान्यात दाखल असलेल्या पत्नीच्या उपचारावर दीड लाख रुपये ...
आदर्शनगरातील घटना : उपचारांना पैसे नसल्याने घेतला आत्महत्येचा निर्णय
जळगाव : दवाखान्यात दाखल असलेल्या पत्नीच्या उपचारावर दीड लाख रुपये खर्च केले. अजून पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने नैराश्यात आलेल्या दीपक रतिलाल सोनार (वय ६५) व मुलगा परेश (३४) या पिता-पूत्राने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ वाजता आदर्शनगरात उघडकीस आली.
मुलगी व जावई रुग्णालयात असताना ते दीपक सोनार यांना फोन करीत होते. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जावई घरी आले. त्यावेळी त्यांना सासरे व शालक मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची शेजारी चर्चा होताच महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलिसांना कळविले. त्यानंतर रुग्णवाहिका आणली व मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना केला. तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.