मद्यपी पतीकडून पत्नीची हत्या
By admin | Published: March 14, 2017 04:39 PM2017-03-14T16:39:06+5:302017-03-14T16:39:06+5:30
दारुच्या नशेत असलेल्या पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पतीने पत्नीच्या दोन्ही पायावर व गुप्तांगावर चेहऱ्यावर जबर मारहाण केल्याने
ऑनलाइन लोकमत
भूसावळ, दि. 14 - दारुच्या नशेत असलेल्या पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पतीने पत्नीच्या दोन्ही पायावर व गुप्तांगावर चेहऱ्यावर जबर मारहाण केल्याने त्यात ती मयत झाल्याची घटना १३ रोजीच्या मध्यरात्री हिंगोणाख ता.यावल येथील किशोर वारके यांच्या शेतातील झोपडीत घडली.
दुधीबाई जवानसिंग बारेला (वय ५०) असे मयत महिलेचे नाव असून पोलिसांनी आरोपी पती जवानसिंग नारसिंग बारेला यास अटक केली आहे़ त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोणा येथील किशोर वारके यांच्या शेतात राहत असलेले जवानसिंग व दुधीबाई बारेला हे पावरा पती-पत्नीने १३ रोजी मद्य प्राशन केले होते़ मद्याच्या नशेत या दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाले. या वादामध्येच जवानसिंग याने पत्नी दुधीबाई हिस लाकडी दांडक्याने व रबरी पट्ट्याने दोन्ही पायाच्या गुडघ्यांवर व गुप्तांगावर तसेच चेहऱ्यावर जबर मारहाण केली व त्यातच दुधीबाईचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
याप्र्रकरणी हिंगोणा पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी तक्रार दिल्यावरून जवानसिंग बारेला याच्याविरुद्ध भादंवि ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जवानसिंग यास अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी डीवायएसपी अशोक थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी भेट दिली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेहेते व सहकारी करीत आहेत. (वार्ताहर)