पत्नी, मुलगा, मुलगी व बहिणीला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:34 PM2018-07-16T14:34:32+5:302018-07-16T14:37:22+5:30

मनपा निवडणुकीच्या आखाड्यात अनेक विद्यमान नगरसेवकांनी माघार घेतली असली तरी अनेकांनी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलगा किंवा मुलीला संधी दिली असल्याचे दिसून येत आहे. तीन दाम्पत्य तर आई व मुलगा, बहीण-भाऊदेखील निवडणूक रिंगणात आहेत.

Wife, son, daughter and sister | पत्नी, मुलगा, मुलगी व बहिणीला संधी

पत्नी, मुलगा, मुलगी व बहिणीला संधी

Next
ठळक मुद्देअनेक दिग्गजांनी घेतली माघारतीन दाम्पत्य निवडणूक रिंंगणातसर्वच पक्षानी दिली कुटुंबातील अनेक सदस्यांना उमेदवारी

जळगाव : मनपा निवडणुकीच्या आखाड्यात अनेक विद्यमान नगरसेवकांनी माघार घेतली असली तरी अनेकांनी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलगा किंवा मुलीला संधी दिली असल्याचे दिसून येत आहे. तीन दाम्पत्य तर आई व मुलगा, बहीण-भाऊदेखील निवडणूक रिंगणात आहेत.
मनपाच्या ७५ जागांसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होणार असून, बुधवारी भाजपा, शिवसेना, राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसकडून आपल्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वच पक्षांनी एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना उमेदवारी दिली असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये तीन पती-पत्नींना संधी दिली आहे. यामध्ये श्यामकांत सोनवणे-राखी सोनवणे, नितीन बरडे - संगीता बरडे व सुनील महाजन- जयश्री महाजन या दाम्पत्यांना पक्षाने संधी दिली आहे. श्यामकांत सोनवणे हे प्रभाग ११ अ मधून तर राखी सोनवणे या प्रभाग ५ ब मधून निवडणूक लढवित आहेत. तर संगीता बरडे या १३ ड तर नितीन बरडे हे १२ अ मधून निवडणूक रिंगणात आहेत.
माजी उपमहापौर सुनील महाजन व जयश्री महाजन यांनी प्रभाग १५ अ व ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माजी नगराध्यक्ष पांडुरंग (बंडू) काळे यांची सुन दीपमाला काळे व मुलगा अमित काळे हे देखील निवडणूक रिंगणात असून, भाजपाकडून त्यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले माजी महापौर ललित कोल्हे व त्यांच्या आई सिंधूताई कोल्हे या यंदा भाजपाकडून प्रभाग ११ मधील क व ड मधून निवडणूक लढवित आहेत. माजी महापौर जयश्री धांडे व त्यांचा मुलगा अमोल धांडे हे देखील शिवसेनेकडून निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. तसेच माजी नगरसेवक उल्हास साबळे यांचा मुलगा स्वप्नील साबळे हे देखील प्रभाग ७ क मधून निवडणूक लढवित आहे.

आमदारांच्या सौभाग्यवतींनाही उमेदवारी
आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या देखील निवडणूक रिंगणात असून त्या प्रभाग ७ अ मधून निवडणूक लढविणार आहेत. त्यासह चोपड्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या प्रभाग १९ अ मधून शिवसेनेकडून निवडणूक लढविणार आहेत.
माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे यांचा मुलगा अक्षय सोनवणे, माजी महापौर अशोक सपकाळे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा राजू सपकाळे हा देखील निवडणुकीत आपले भविष्य अजमावणार आहे. तसेच विद्यमान नगरसेवक संदेश भोईटे यांच्याऐवजी त्यांची पत्नी स्रेहा भोईटे या निवडणूक लढविणार आहेत. जनक्रांतीचे नगरसेवक सुनील पाटील यांच्या ऐवजी त्यांच्या आई रेखा पाटील या निवडणूक लढविणार आहेत.
अण्णा भापसे यांच्याऐवजी त्यांची पत्नी जिजाबाई भापसे, मनपा विरोधी पक्षनेते वामनराव खडकेंऐवजी त्यांचा मुलगा सुनील खडके निवडणूक लढवित आहेत.

Web Title: Wife, son, daughter and sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.