क्रीम पोस्टिंगच्या पैशासाठी पोलिसाकडून पत्नीचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 05:53 AM2020-03-02T05:53:46+5:302020-03-02T05:54:02+5:30
‘मालदार’ पोलीस ठाण्यात, क्रीम पदावर बदली व्हावी यासाठी लागणारे १५ लाख रुपये माहेरुन आणावे म्हणून पोलीस अधिकाऱ्याने पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जळगाव : ‘मालदार’ पोलीस ठाण्यात, क्रीम पदावर बदली व्हावी यासाठी लागणारे १५ लाख रुपये माहेरुन आणावे म्हणून पोलीस अधिकाऱ्याने पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डाबकी जि.अकोला येथे कार्यरत किशोर वानखेडे या सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध रविवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक येथील सिडको चाणक्य नगरात रहिवासी योगिता यांचे २०११ मध्ये अमळनेर येथील किशोर यांच्यासोबत लग्न झाले. लग्नाच्या वेळी योगिता हिच्या कुटुंबियांनी ८ लाख २५ हजार रुपये हुंडा व लग्न असा एकूण १५ लाख रुपयांचा खर्च केला. लग्नानंतर पतीची पहिली नेमणूक पुणे येथे झाली. त्यानंतर नाशिक, बुलढाणा याठिकाणी बदली झाली. या दाम्पत्याला मुलगी व मुलगा आहे.