वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यास केले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 04:58 PM2019-06-09T16:58:23+5:302019-06-09T16:58:33+5:30

रुपनगर येथील घटना : दोन दिवसांपासून होता बेपत्ता

The wild animals killed the farmer | वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यास केले ठार

वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यास केले ठार

Next


महिंदळे ता भडगाव : येथून जवळच असलेल्या पळासखेडे रूपनगर येथील पुरा मोहन वंजारी (वय ५५ ) हा शेतकरी रात्री शेतात गुरांची राखन करण्यासाठी शेतात झोपला असता त्याच्यावर वन्य प्राण्यांनी हल्ला चढवून ठार केले. ही घटना गूराखी गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या गुराख्याच्या लक्षात आली.
याबाबत खळबळजनक घटनेबाबत वृत्त असे की, रूपनगर येथील पुरा वंजारी या शेतकºयाचे गुरांची राखन करण्यासाठी शेतात वास्तव्यास होते . परंतू गेल्या दोन दिवसांपासून ते शेतातून गायब होते. मुलांनी दोन दिवसांपासून त्यांचा शोध घेणे सुरू केले होते. पण ते कुठेही मिळून आले नाहीत.नातलगांकडेही त्यांचा शोध घेतला पण तपास लागत नव्हता. दरम्यान रविवारी ९ रोजी सकाळी तरवाडे येथील गुरांखी जंगलात गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांना प्राण्यांनी खाल्लेले प्रेत दिसले. त्यांनी गावात हा प्रकार कळवला. गावकऱ्यांनी पाहिले असता तो रूपनगर पुरा याचा मृतदेह असल्याचे समजले.
या भागात वन्य प्राण्यांची असते कायम दहशत
रूपनगर शेत शिवाराला लागून पाचोरा वनविभाग व पारोळा वनविभाग मोठ्या प्रमाणात विखूरलेला आहे. घनदाट जंगल असल्यामुळे येथे वन्य प्राण्यांची दहशत आहे. या आधीही अनेक शेतकºयांची गुरे व शेती पिकांचे प्राण्यांनी नुकसान केले आहे. आता मात्र शेतकºयावरच हल्ला चढवून ठार केले असल्याने परिसरात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन्य प्राण्यांनी खाल्ले शेतकºयाचे पूर्ण शरीर
पुरा वंजारी याच्यावर वन्य प्राण्यांनी हल्ला चढवून ठार केले व घनदाट जंगलात ओढत नेऊन पुर्ण शरीर खाऊन टाकले. चेहºयाचा काही भाग व हाडे शिल्लक आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी व भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या सह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: The wild animals killed the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.