वन्य प्राण्यांची शिकार करणा-या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 09:36 PM2019-11-11T21:36:24+5:302019-11-11T21:38:32+5:30
जंगलांमध्ये वन्यप्राण्यांची शिकार करणा-या टोळीचा जामनेर पोलिसांनी सोमवारी पहाटे पर्दाफाश केला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पाठलाग करताना दोन जण पळून जाण्यास यशस्वी झाले. दरम्यान, अटक केलेल्या दोघांकडून दोन बंदुका, ४८ मोठे जिवंत राऊंड, एक चारचाकी वाहन,काळविट व निलगायीचे मांस जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये महेमुद मोहम्मद अबीद (४५) व अन्सारी सोद मोहमद अबीद (३२ ) दोन्ही रा.धुळे यांचा समावेश आहे.
जळगाव : जंगलांमध्ये वन्यप्राण्यांची शिकार करणाºया टोळीचा जामनेर पोलिसांनी सोमवारी पहाटे पर्दाफाश केला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पाठलाग करताना दोन जण पळून जाण्यास यशस्वी झाले. दरम्यान, अटक केलेल्या दोघांकडून दोन बंदुका, ४८ मोठे जिवंत राऊंड, एक चारचाकी वाहन,काळविट व निलगायीचे मांस जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये महेमुद मोहम्मद अबीद (४५) व अन्सारी सोद मोहमद अबीद (३२ ) दोन्ही रा.धुळे यांचा समावेश आहे.
जामनेर तालुक्यातील नागनचौक जंगलात सोमवारी पहाटे पाच वाजता काही जण वाहने व बंदूका घेऊन नीलगाय व काळवीटची अवैधरित्या शिकार करीत करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना मिळाली. इंगळे यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, उपअधीक्षक ईश्वर कातकाडे यांना कळवून सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, उपनिरीक्षक विकास पाटील, सहायक फौजदार जयसिंग राठोड, ईस्माईल शेख, राहुल पाटील, सचिन पाटील,अमोल घुगे, प्रदीप पोळ यांना सोबत घेऊन तात्काळ नागनचौकी जंगल गाठले.वाडीकिल्ला येथील पोलीस मित्र विलास पाटील व गावकºयांची मदत घेवून संशयितांना घेराव घातला.
पाठलाग करताना वाहन उलटले
नागनचौकी जंगलात संशयितांना घेरल्यानंतर दोन जण वाहन सोडून जंगलात पळून जाण्यात यशस्वर झाले तर अन्य दोघं जणांनी चारकाचीतून (एम.एच.०२ जे ९७६०) पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला असता ही चारचाकी रस्त्यात उलटली, त्यात अन्सारी सोद मोहमद अबीद याच्या डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला. त्याचा दुसरा साथीदार महेमुद मोहम्मद अबीद याला पक डण्यात आले. पलायन केलेल्यांची नावे हर्षद ड्रायव्हर रा.अकबर चौक, धुळे व उस्मान शहा रा.नाचणखेडा ता.जामनेर असे आहेत. या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, कर्मचारी तुळशिराम नागोराव घरजाळे, अशोक ज्योतीराम सपकाळे हे देखील सहभागी झाले होते.याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहायक धरमसिंग सुंदरडे करीत आहे.