... तर 'बिग बॉस'मध्येही जाईल, मंत्री गुलाबरावांनी सांगितली 'सुवर्ण संधी'

By Ajay.patil | Published: September 30, 2022 02:24 PM2022-09-30T14:24:23+5:302022-09-30T14:24:41+5:30

महेश मांजरेकरांच्या ईच्छेला गुलाबराव पाटलांनी दिली साद : बिग बॉस सारखी सोन्याची संधी नाही

... will also go to 'Bigg Boss', Minister Gulabrao Patil expressed his 'Lay Bhari' wish | ... तर 'बिग बॉस'मध्येही जाईल, मंत्री गुलाबरावांनी सांगितली 'सुवर्ण संधी'

... तर 'बिग बॉस'मध्येही जाईल, मंत्री गुलाबरावांनी सांगितली 'सुवर्ण संधी'

googlenewsNext

अजय पाटील 

जळगाव - राजकारणात येण्याच्या आधी  मी नाटकात, गाण्यांमध्ये भाग घेत होतो. त्यामुळे जर मला कोणी बिग बॉसमध्ये बोलावले तर नक्कीच ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल व मी बिग बॉसमध्ये जाईल असे पालकमंत्रीगुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. पालकमंत्र्यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलेल्या ईच्छेला एक प्रकारे साद दिल्याचे दिसून येत आहे.

लवकरच मराठी बिग बॉसचे सीजन येत असून, एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांना कोणत्या राजकीय व्यक्तींना बिग बॉसमध्ये सहभागी होणे आपल्याला आवडेल असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मांजरेकरांनी नितेश राणे, अमोल मिटकरी यांच्यासह पाणी पुरवठा मंत्रीगुलाबराव पाटील यांचे नाव घेत, जर हे नेते बिग बॉसच्या घरात आले. तर बिग बॉसची टीआरपी आणखीनच वाढेल असे मांजरेकरांनी सांगितले होते. याबाबत शुक्रवारी पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी जर संधी मिळाली किंवा कोणी बोलावले तर नक्कीच बिग बॉसमध्ये जाईल असे सांगितले आहे.  

जिल्ह्यातून १० हजार कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी जाणार

दसरा मेळावा हा काही आमच्यासाठी आजचा सण नाही, गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही दसरा मेळावा साजरा करतो आहे. दसरा मेळाव्यासाठी नियोजन सुरू आहे, आढावा बैठका घेतल्या जात आहेत, किती कार्यकर्ते मुंबईला जातील, याची चाचपणी सुरु आहे. जळगाव ग्रामीण व जळगाव शहर मिळून अडीच हजार तर जिल्ह्यातून १० हजार कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी जाणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

दसरा मेळावा हायजॅक करण्याची गरज नाही

दसरा मेळाव्याला नेहमी बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं हे लुटलं जातं, त्यामुळं हेच विचारांचं सोनं लुटण्याचा आमचा प्रयत्न आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याला नक्कीच  प्रतीसाद चांगला मिळेल, असे असताना कुणी हायजॅक म्हणो किंवा काही म्हणो , आम्ही बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे नाही पण विचारांचे वारसदार म्हणून दसरा मेळावा साजरा करत आहेत, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Web Title: ... will also go to 'Bigg Boss', Minister Gulabrao Patil expressed his 'Lay Bhari' wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.