कामबंदमुळे गाळे लिलाव होतील का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:19 PM2018-04-19T13:19:11+5:302018-04-19T13:19:11+5:30

Will auction the car due to labor? | कामबंदमुळे गाळे लिलाव होतील का ?

कामबंदमुळे गाळे लिलाव होतील का ?

Next

अजय पाटील
जळगाव-महापालिकेच्या मुदत संपलेल्या २० मार्केटमधील गाळे ताब्यात घेवून, त्या गाळ्यांचा लिलाव करण्यात यावा व त्यातून मिळणाऱ्या रक्कमेतुन मनपा कर्मचाºयांचे अनेक महिन्यांपासूनचे थकीत वेतन अदा करावे या मागणीसाठी मनपा कर्मचाºयांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. तसेच मंगळवारी लेखणीबंद आंदोलन केल्याने संपूर्ण कामकाज ठप्प होते. मनपा कर्मचाºयांकडून पुकारण्यात आलेल्या कामबंद मुळे महापालिका प्रशासनावर दबाव येवून गाळे लिलावाची प्रक्रिया तत्काळ सुरु होईल अशी आशा आहे.मात्र, उच्च न्यायालयाचा आदेशानंतर ९ महिने उलटूनही मनपाकडून गाळे लिलावाची प्रक्रिया अद्याप राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे मनपा कर्मचाºयांचा कामबंद आंदोलनाची दखल घेवून मनपा प्रशासन तत्काळ कारवाई करून गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु होईल का ? हा प्रश्न निर्माण होत आहे.
मनपा कर्मचाºयांकडून करण्यात आलेले आंदोलन हे गाळे धारकांनी गेल्या महिन्यात पुकारलेल्या आंदोेलनाला उत्तर असून, प्रशासनाव्दारे शासनावर दबाव टाकण्यासाठी कामबंद आंदोलन सुरु करण्यात आल्याची चर्चा आहे. कामबंद आंदोलनादरम्यान, सफाई, करवसुलीचे कामे देखील थांबणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना देखील फटका बसणार आहे. गाळेधारक व प्रशासनाच्या वादामध्ये नाहक सर्वसामान्य जनता व मनपा कर्मचाºयांना खेचण्याचा हा प्रयत्न सध्या दिसून येत आहे. मनपाला जर न्यायालयाने आदेश दिले आहेत तर थेट कारवाई करण्यास काय अडचण आहे ? हा प्रश्न मनपातील कर्मचाºयांसह नागरिकांना देखील पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी मनपा अधिनियमात बदल करण्यात येणार असल्याचे आश्वासन गाळेधारकांना दिले होते.
मात्र ७ एप्रिल रोजी नगरविकास खात्याचा उपसचिवांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून न्यायालयाचा अवमान न करता कार्यवाही करण्याचा सुचना दिल्या होत्या. त्यानंतर मनपा आयुक्तांनी थकीत गाळेधारकांना बिले वाटपाची प्रक्रिया सुरु केली. मात्र, अद्याप गाळे ताब्यात घेण्याबाबत कोणतीही प्रक्रिया प्रशासनाने केलेली नाही. जे ढीम्म मनपा प्रशासन उच्च न्यायालय व शासनाच्या नगरविकास खात्याच्या सूचनांनरतही कारवाईसाठी सरसावले नाही. ते प्रशासन कर्मचाºयांचा कामबंद आंदोलनाची दखल घेवून खरोखरच कारवाई करेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मनपा कर्मचाºयांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाबाबत अद्याप मनपा प्रशासनाने कुठल्याही कर्मचारी किंवा विभागप्रमुखांना सूचना देखील पाठविल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाची भूमिका अद्याप देखील स्पष्ट नाही. मनपा कर्मचाºयांचा आंदोलनानंतर प्रशासन काय कारवाई हे पाहणे आता औत्सुक्याचे आहे.

Web Title: Will auction the car due to labor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव