रिक्त जागांचे भिजत घोंगडे यंदा सुटणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:17 PM2019-02-09T23:17:27+5:302019-02-09T23:17:39+5:30
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत आरटीईची आॅनलाईन प्रवेश प्रकिया
सागर दुबे़
वंचित आणि गरिब कुटूंबातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, या करिता शासनाकडून शिक्षण हक्क कायद्यातंर्गत आरटीईची आॅनलाईन प्रवेश प्रकिया राबविण्यात येत असते़ मात्र, दरवर्षी मोठ्या संख्येने काही न काही कारणामुळे तसेच त्रुटींमुळे शेकडो विद्यार्थी हे प्रवेशापासून वंचित राहतात़ मागील वर्षी आरटीईच्या ११७० जागा रिक्तच राहिल्या होत्या़ त्यामुळे आरटीच्या रिक्त जागांचे भिजत घोंगडे यंदा सुटणार का ? असा सवाल उपस्थित होते़
नुकतेच पुणे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून आरटीई आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले़ त्यानुसार शाळांनी केलेल्या नोंदणीनुसार त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे़ त्यानंतर २५ फेबु्रवारीपासून पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करता येणार आहे़ त्यानंतर पहिली सोडत ही १४ मार्च रोजी होणार आहे़ मात्र, यंदा तीनच फेऱ्या राबविण्यात येणार आहे़ मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी सहा फेºया राबविण्यात आल्या होत्या़ तरी देखील ११७० जागा या रिक्तच राहित्या होत्या़ यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची काही शाळांमध्ये निवड होऊनही त्यांनी प्रवेश घेतला नाही. काही विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे यंदा तीनच फेºया राबविण्यात येणार असल्यामुळे रिक्त जागांची संख्या कमी होईल का वाढेल हा प्रश्न आहे़ सहा फेºया राबवून देखील हजाराच्यावर जागा रिक्त असताना तीन फेºया राबविणे योग्य आहे का? असा सवाल शिक्षणतज्ञांकडून उपस्थिती होत आहे़ यंदा किती विद्यार्थ्यांना, किती शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही़ परंतू, आरटीईच्या रिक्त जागांची परंपरा ही यंदा मात्र मोडीस काढण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग काय प्रयत्न करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे़