रुग्णालयाविषयी नव्याने विश्वास निर्माण करणार - डॉ. जयप्रकाश रामानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 12:47 PM2020-06-24T12:47:57+5:302020-06-24T12:48:17+5:30

रुग्णालयातील दुर्दैवी घटनांनी कर्मचाऱ्यांचे खचलेले मनोबल वाढवण्याचा प्रयत्न

Will create new confidence about the hospital | रुग्णालयाविषयी नव्याने विश्वास निर्माण करणार - डॉ. जयप्रकाश रामानंद

रुग्णालयाविषयी नव्याने विश्वास निर्माण करणार - डॉ. जयप्रकाश रामानंद

Next

आनंद सुरवाडे
जळगाव : कोविडच्या तीन महिन्यात रुग्णालयाचे मनुष्यबळ थकलेले आहे, दुर्दैवी घटनांनी त्यांचे मनोबलही खचले आहे़ त्यांचे मनोबल वाढवून, सर्वांच्या समन्वयातून मृत्यूदर घटविणे व या रुग्णालयाविषयी सामान्यांमध्ये नव्याने एक विश्वास निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे़ हे आव्हान आम्ही यशस्वीपणे पेलणार आहोत, असा विश्वास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केला़
प्रश ्न: राज्याचे सर्व लक्ष जळगाववर असताना शिवाय आधीचे अधिष्ठाता निलंबित झाल्यानंतर तुम्ही पदभार स्वीकारला याकडे कसे बघता?
उत्तर : याकडे एक आव्हान म्हणून बघतो़ साध्या पिचवर कुणीही बॅटींग करू शकते़ आजपर्यंतचा माझा जो अनुभव आहे त्याची पूर्ण कसोटी लागणार हे निश्चित मात्र, या कसोटीवर खरा उतरण्याचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे़ सध्या मृत्यूदर घटविणे व रुग्णालयाची प्रतिमा उंचावून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ही आव्हाने प्रामुख्याने आहेत़
प्रश ्न:रुग्णालयात काय उणिवा जाणवल्या.. त्या दूर करण्यासाठी काय नियोजन आहे?
उत्तर : वैद्यकीय अधीक्षक निलंबित झाल्यामुळे मी सर्व माहिती घेऊन एक सक्षम अधिकारी म्हणून डॉ़ दत्तात्रय बिराजदार यांची नेमणूक केली़ औषधवैद्यक शास्त्राबाबत डॉ़ विजय गायकवाड यांच्याकडे जबाबदारी सोपावली़
मनुष्यबळाचे नियोजन केल्यानंतर इंफ्रास्टकचरवर काम केले़ आॅक्सिजनचे काम करणाºया डॉक्टरांना केवळ साठा नव्हे तर सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून माहिती देण्याच्या सूचना दिल्या़ सेंट्रल आॅक्सिजनच्या पाईपलाईनच्या कामाला गती दिली़ १५० बेडचे काम पूर्ण झाले आहे़ काहींचे लवकरच होईल, उपसंचालक ठाणे यांच्याकडून २०० जम्बो सिलींडर मागविले असून शंभर आलेले आहेत़ यासह लवकरच १९ व्हँटीलेटर येणार आहेत़ मॉनीटर्स आले़
प्रश ्न:अनेक डॉक्टर पगार घेऊन सेवा देत नसल्याचे आरोप वारंवार होत आहेत़
उत्तर :जे डॉक्टर कामाला नाहीत त्यांना सर्वांना कामाला लावले आहेत़ नियमावलीनुसार सर्वांच्या ड्युट्या लावल्या आहेत़ जे कामावर नसतील त्यांचे पगार काढल्यास कारवाई करेल, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे़ याठिकाणी किती कर्मचारी आहेत कोणाकडेच याद्या नाहीत, त्या याद्या मागविल्या असून सर्वांशी बोलणार आहे़
सर्वाच्या सुट्या रद्द
सुट्या कोणाला मिळणार नाहीत. मुंबईहून १४ डॉक्टर्स आले असून २८ परिचारिका आल्या आहेत. बाहेरून आलेले डॉक्टर्स अनुभवी आहेत, त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यांच्या ड्युटी अतिदक्षता विभागात लावलेल्या आहेत़
रुग्णाला आॅक्सिजनचा पुरवठा वेळेवर सुरळीत होणे अत्यावश्यक असते़ मात्र, रुग्ण संख्याच वाढणार नाही, याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे़ रुग्ण वाढले नाहीत तर मृत्यू होणार नाही, यात नागरिकांनी लवकर रुग्णालयात येणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे़
गंभीर व आवश्यकता असल्यास सर्व सुविधा रुग्णांना जागेवरच देण्याचा प्रयत्न आहे़ त्यामुळे आगामी अप्रिय घटना टाळता येतील़
- डॉ. रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Web Title: Will create new confidence about the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव