असंतुष्टांची मोट खडसे बांधतील ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 12:46 PM2020-09-06T12:46:36+5:302020-09-06T12:47:53+5:30
वाढदिवसाचे निमित्त साधून अन्यायाची पुन्हा एकदा तक्रार, देवेद्र फडणवीसांचा प्रथमच थेट नामोल्लेख करुन इरादा केला स्पष्ट, राज्य दौºयात कोठे जाणार आणि कुणाला भेटणार याची उत्सुकता
मिलिंद कुलकर्णी
एकनाथराव खडसे हे भाजपमधील ज्येष्ठ नेते. ४० वर्षांपासून राजकारणात आणि त्यातही अधिक काळ विरोधी पक्षात राहिले. अभ्यासूवृत्ती, प्रचंड जनसंपर्क, सहज उपलब्धता, प्रशासकीय अधिकाºयांशी उत्तम ताळमेळ आणि वक्तृत्वशैली यामुळे अल्पावधीत ते राज्यपातळीवरील नेते बनले. सत्ता असो की, नसो जळगाव जिल्ह्यात केवळ आणि केवळ एकनाथराव खडसे यांचा शब्द चालत असे. सरपंच ते १२ खात्यांचे कॅबिनेट मंत्री असा प्रवास करणाºया या नेत्याची अस्वस्थता वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा एकदा दिसून आली. ‘माझे काय चुकले’ या त्यांच्या प्रश्नाला कुणी उत्तर देत नाही.
भाजप पूर्वीचा राहिलेला नाही. गोपीनाथ मुंडे पक्षावर रुसले असता त्यांची समजूत घालण्यासाठी कसे प्रयत्न झाले, हा इतिहास आहे. पण जिथे लालकृष्ण अडवाणी, डॉ.मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या सारख्या नेत्यांना ‘मार्गदर्शक मंडळा’त स्थान देऊन एका अर्थाने निवृत्त केले गेले, तोच नियम बहुदा खडसे यांच्याबाबत लावलेला दिसतो.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजप त्यांना तिकीट देणार नाही, असे चित्र असताना अजित पवार यांनी राष्टÑवादीचा एबी फॉर्म मुक्ताईनगरच्या कार्यकर्त्याकडे पाठविल्याचे आता खडसेनीच कबूल केले आहे. त्यावेळी चार दिवस घोळ घालण्यापेक्षा खडसे यांनी राष्टÑवादीचे तिकीट घ्यायला हवे होते, असे त्यांच्या समर्थकांना आताही वाटते. एकीकडे सूनबार्इंची खासदारकी, दुसरीकडे कन्येला दिलेले विधानसभेचे तिकीट अशा कोंडीत खडसे सापडले आणि त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांची सरशी झाली.
भाजपाची महाराष्टÑातील सत्ता जाऊन ९ महिने उलटले. शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार दीड वर्षे तरी पडत नाही, असे खडसे आता म्हणत आहेत. त्यात तथ्य आहे. सेनेपेक्षा काँग्रेस - राष्टÑवादीच्या नेत्यांना सत्तेची आवश्यकता अधिक आहे. सहकारी साखर कारखाने, शिक्षण संस्था यांची स्थिती गेल्या सहा वर्षांत बिकट झालेली आहे. सहकार व शिक्षण क्षेत्राद्वारे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची सत्ता राबविली जात असते. प्रभावक्षेत्र कमकुवत झाल्यास राजकीय अडचणी वाढतात, हा अनुभव असल्याने सरकारमधून बाहेर पडण्यापूर्वी शंभरदा विचार केला जाईल.
या राजकीय पार्श्वभूमीवर खडसे यांनी जाहीर केल्यानुसार ते कोरोना काळानंतर राज्याचा दौरा करणार आहेत. याचा अर्थ, भाजपमध्ये असंतुष्ट, नाराज असलेल्या मंडळींची मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. परंतु, मोदी - शाह यांच्या नेतृत्वाविरुध्द भाजपमधील कोणी नेता जाईल, असे चित्र आतातरी दिसत नाही. त्यामुळे खडसे यांच्या मोहिमेला कितपत यश मिळते, हे बघायला हवे. राज्यस्तरीय सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असले तरी जळगाव जिल्ह्यात बदलत्या परिस्थितीत इतर पक्षीय त्यांचे नेतृत्व कितपत स्विकारतील, हा प्रश्न आहे. पुढील काळात जिल्हा बँक, दूध संघ, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यात खडसे यांची भूमिका महत्त्वाची राहील, त्यामुळे त्यांच्या हालचालीकडे भाजप श्रेष्ठींचेही लक्ष राहील. नेमके काय घडेल, याचे चित्र आता स्पष्ट होत नसले तरी ‘जर - तर’ अशा शक्यता अधिक आहेत.
भाजपमधील असंतुष्ट नेते एकनाथराव खडसे यांची तोफ वाढदिवसाचे निमित्त साधून पुन्हा गरजली. त्यांच्या आरोपांच्या फैरीमध्ये नवीन काही नव्हते, परंतु फडणवीसांचा प्रथमच थेट नामोल्लेख केला. यावरुन इरादा स्पष्ट दिसतो.
महाराष्टÑात पुन्हा सत्ता मिळविण्यात
अपयश येऊनही माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावरील पक्षश्रेष्ठींचा विश्वास तसूभरही कमी झालेला दिसत नाही. शिवसेना दूर गेली तरी पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना दोषी मानले नाही. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. आता तर बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारीपद दिले. असे असताना खडसेसोबत कोण असंतुष्ट राहतील, हा प्रश्न आहेच.