कायद्याचा अंमल चोखपणे करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:20 AM2021-08-27T04:20:54+5:302021-08-27T04:20:54+5:30
रावेर : महाराष्ट्र पोलीस दलासंबंधी जगभरात नावलौकिक आहे. तर, समाजातील १० ते १५ टक्के असलेल्या समाजकंटकांना वठणीवर आणण्यासाठी मात्र ...
रावेर : महाराष्ट्र पोलीस दलासंबंधी जगभरात नावलौकिक आहे. तर, समाजातील १० ते १५ टक्के असलेल्या समाजकंटकांना वठणीवर आणण्यासाठी मात्र कायद्याचा चोखपणे अंमल करून या शहराची शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल, असे आश्वासन बुलडाणा येथून नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिले. रावेर पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समिती बैठक, पोलीसपाटील तथा पोलीस स्टेशनद्वारे आयोजित स्वागत व निरोप समारंभात ते बोलत होते.
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांची जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस स्टेशनला बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी तर त्यांच्या जागी बुलडाणा येथून नव्याने बदलून आलेले पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या स्वागतानिमित्त रावेर पोलीसस्टेशन, शांतता समिती तथा प्रतिष्ठित नागरिकांद्वारे हा संयुक्त समारंभ आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी, रावेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोहर जाधव, फौजदार अनिस शेख व पोलीस कर्मचारी वृंदातर्फे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, फौजदार मनोज वाघमारे, सहायक फौजदार गफूर शेख, पोहेकॉ जितेंद्र जैन, पोना निलेश चौधरी, पोकॉ ज्ञानेश्वर चौधरी यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन निरोप देण्यात आला, तर नवनियुक्त पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी ॲड. योगेश गजरे, दिलीप कांबळे, रसलपूरचे अय्युब पहेलवान, शिवसेना तालुका संघटक अशोक शिंदे, वासुदेव नरवाडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजप किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, शिवसेना जिल्हाउपप्रमुख प्रल्हाद महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजप शहरप्रमुख दिलीप पाटील, राकाँ तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विनायक महाजन, मुस्लिम पंच कमिटीचे गयास शेख, रफिक शेख, युसूफ खान, नगरसेवक सादिक शेख, असदुल्ला खाँ, धनगर समाज महासंघाचे हिरालाल सोनवणे, सराफा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय गोटीवाले, पोलीसपाटील लक्ष्मीकांत लोहार, संतोष पाटील, शैलेंद्र अग्रवाल, बॅटरी व्यावसायिक इम्रान खान, दत्तछाया प्रतिष्ठानचे संचालक राजेंद्र चौधरी, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी तर सूत्रसंचालन चंद्रकांत विचवे यांनी केले.
रावेर पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक कैलास नागरे हे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना निरोप देताना. सोबत सुनीताबाई वाकोडे.