युतीतील मनभेद मिटणार की राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:59 PM2019-03-18T12:59:19+5:302019-03-18T13:00:22+5:30

तालुका वार्तापत्र मुक्ताईनगर

Will the mindset of the alliance be eradicated? | युतीतील मनभेद मिटणार की राहणार

युतीतील मनभेद मिटणार की राहणार

Next
ठळक मुद्देशिवसेनेच्या इशाऱ्यावर भाजपाचा प्रतिइशारा शिवसेनेच्या इशाऱ्यावर भाजपाचा प्रतिइशारा



मुक्ताईनगर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यात युतीतील घटक पक्ष शिवसेना प्रमुख विरोधी भूमिकेत आहे. राज्यात भाजप- सेना युती झाली आहे. संभाव्य उमेदवार म्हणून खासदार रक्षा खडसे आहेत. अशात खडसे परिवारात लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास शिवसेना भाजपचे काम करणार नाही अशी भूमिका स्थानिक शिवसेना नेत्यांनी घेतली आहे. युती धर्म न पाळल्यास त्याचे अन्य ठिकाणी पडसाद उमटतील असा इशारा आमदार खडसे यांनी दिला आहे. यामुळे युतीतील मनभेद या निवडणुकीत कायम राहतील की, शिवसैनिक भाजपचे काम करतील का ? हा औत्सुक्याचा विषय बनला आहे.
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रे्रेस असा राजकीय सामने रंगणाºया या तालुक्यात राष्ट्रवादी काँगेसला जि.प.सदस्य निवडीचे संमिश्र यश आणि पंचायत समितीे फक्त एक वेळेस ताब्यात मिळविण्यापलिकडे फारसे यश मिळाले नाही.
सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप- सेना युती तुटली आणि शिवसेनेतर्फे चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविली. येथून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हे समिकरण बदलले आणि भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र तयार झाले. तालुक्यात शिवसेनेचे संघटन आणि प्रभाव वाढला आहे, परंतु निवडणूक यशात ते उतरवू शकलेले नाही.
मध्ये जि.प., पं.स.निवडणुका झाल्या. मुक्ताईनगर तालुक्यातील ४ पैकी ४ जि. प. व ८ पैकी ६ पं.स. जागा भाजपा ने मिळविल्या आणि नुकतेच मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षासह १७ पैकी १४ जागा भाजपाने मिळविल्या. त्यामुळे भाजपची तालुक्यातील पकड कायम आहे. अश्यात राज्यात भाजप सेना युती असल्याने भाजप विरोधात संघर्ष करून अस्तित्व निर्माण करणारे शिवसैनिक भाजपाचा प्रचार करतील की विरोधात जातील हे लक्ष वेधी ठरणार आहे.
खासदार रक्षा खडसे यांची कामगिरीच्या आधारावर उमेदवारी निश्चित मानले जात आहे. एकनाथराव खडसे यांच्या वलयापलिकडेही त्यांनी फळी उभारलेली आहे.
एकनाथराव खडसे राज्यात सत्ता असतांना तब्बल पावणेतीन वर्षांपासून सत्तेपासून लांब आहेत.‘हमे तो अपनों ने लूटा गैरो मे कहा दम था’ अशा अवस्थेत असलेले खडसे यांनी संघर्षातून खान्देशात पक्ष वाढविला हे जगजाहीर आहे. आणि आज सत्तेची फळ त्यांच्या हाताखाली काम करणारे चाखत आहेत, अशीखंत व्यक्त केली जात आहे. पक्षात त्यांना अडवाणींसारखे मार्गदर्शक मंडळात टाकण्याचे सुरू असलेले प्रयत्न क्लेश दायक आहेत. काहीही झाले तरी पक्ष सोडणार नाही, ही भूमिका खडसे यांनी घेतली आहे त्यामुळे पक्षाविरोधात बोलता येईना आणि मनाची खंत रोखता येईना. यातून त्यांनी अनेक खळबळजनक विधाने करून संकट वाढविले असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Will the mindset of the alliance be eradicated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.