भविष्यात निवडणूक लढविणार नाही : माजी मंत्री सुरेशदादा जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2017 02:13 PM2017-05-07T14:13:59+5:302017-05-07T14:13:59+5:30

लायन्स क्लब कडून जळगावातील बहिणाबाई उद्यानातील कामांचा लोकार्पण सोहळा

Will not contest the elections in the future: Former minister Sureshdada Jain | भविष्यात निवडणूक लढविणार नाही : माजी मंत्री सुरेशदादा जैन

भविष्यात निवडणूक लढविणार नाही : माजी मंत्री सुरेशदादा जैन

Next
>जळगाव, दि.7 - जळगाव शहर अधिक सुंदर, स्वच्छ व हिरवेगार कसे करता येईल यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे. जळगावकरांनी आपल्याला 9 वेळा आमदार करीत भरपूर प्रेम दिले आहे. त्यामुळे भविष्यात निवडणूक लढणार नसल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी रविवारी बोलतांना सांगितले.   
लायन्स क्लब सेंट्रल तर्फे शहरातील बहिणाबाई उद्यानातील निकामी झालेल्या खेळण्याचे दुरुस्तीकरून नवीन खेळणी  व उद्यानाचे सुशोभीकरण केल्यानंतर या नूतनीकरण झालेल्या कार्याचा लोकार्पण सोहळा रविवारी बहिणाबाई उद्यानात झाला. यावेळी सुरेशदादा बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, मनपा स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके, नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, लायन्स क्लबचे सुगोन मुणोत, पुनम अग्रवाल, अनिल पगारीया आदी उपस्थित होते. 
जळगावकरांनी भरपूर प्रेम दिले
सुरेशदादा म्हणाले की, शासनाकडून येणा:या निधीचा वापर शहरातील विकासकामांसाठी नियोजनबध्द रित्या झाला पाहिजे. यासाठी शहरातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आपले पक्षीय राजकारण बाजुला करून केवळ शहराच्या विकासाचा मुद्दा पुढे करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
भविष्यात निवडणुक लढविणार नाही
आमदार सुरेश भोळे यांना भिती बाळगण्याची गरज नाही. भविष्यात मी निवडणूक लढविणार नसल्याचे सुरेशदादा म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर कार्यक्रमात एकच हंशा पिकला. मी 9 वेळा शहराचा आमदार राहिलो आहे, यादरम्यान जळगावकरांनी भरपूर प्रेम दिले असल्याचेही ते म्हणाले. 
 

Web Title: Will not contest the elections in the future: Former minister Sureshdada Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.