‘प्रसंगी विरोधी पक्षाची भूमिका करणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 04:01 AM2018-01-28T04:01:58+5:302018-01-28T04:02:14+5:30
विरोधी पक्षात असताना सत्ताधाºयांना घाम फोडायचो. पुन्हा तीच भूमिका घेण्याची वेळ आली आहे, यापुढे प्रसंगी विरोधी पक्षाची भूमिका करणार असल्याचे सांगत माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांनी शनिवारी पुन्हा एकदा स्वपक्षीयांवर हल्लाबोल केला.
जळगाव - विरोधी पक्षात असताना सत्ताधाºयांना घाम फोडायचो. पुन्हा तीच भूमिका घेण्याची वेळ आली आहे, यापुढे प्रसंगी विरोधी पक्षाची भूमिका करणार असल्याचे सांगत माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांनी शनिवारी पुन्हा एकदा स्वपक्षीयांवर हल्लाबोल केला.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम झाले. त्यात खडसे यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. ४० वर्ष पक्षासाठी काम केले. तरी मला पक्षाकडून अशी वागणूक मिळत आहे, मी काय गुन्हा केला याचा जाब विचारण्यासाठी जनतेच्या दरबारात जाणार आहे. दाऊदच्या बायकोशी फोनवर बोललो असतो तर दाऊदने जिवंत सोडले असते काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जे आरोप करण्यात आले त्याची चौकशी झाली मात्र त्यातून निष्पन्न शून्य निघाले, असे ते म्हणाले. खडसे हे आमचे नेते आहे. त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविणार असल्याची माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली.
कर्जमाफीने शेतकरी का खूश नाही?
राज्य सरकारने ३० हजार कोटींचे कर्ज शेतक-यांना माफ केले. यात एकही शेतकरी खूश नाही, किंवा कुठे शासनाच्या निर्णयाचा आनंद नाही. याचे कारण शोधण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.