अविश्वासापूर्वी राजीनामा देणार - कृउबा सभापती लकी टेलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:39 AM2019-05-05T00:39:36+5:302019-05-05T00:40:06+5:30

आता विशेष सभेकडे लक्ष

Will resign before unbelief - Christubha Speaker Lucky Taylor | अविश्वासापूर्वी राजीनामा देणार - कृउबा सभापती लकी टेलर

अविश्वासापूर्वी राजीनामा देणार - कृउबा सभापती लकी टेलर

Next

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १५ संचालकांनी अविश्वास ठरावासाठी दिलेल्या प्रस्तावानंतर विशेष सभेसंदर्भात प्रशासनाकडून अद्याप निर्णय झालेला नाही. दुसरीकडे अविश्वासासंदर्भात निर्णय होण्यापूर्वीच आपण राजीनामा देणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांनी दिली. दरम्यान, या संदर्भात पाटील हे शनिवारी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेणार होते, मात्र बाहेर गावी गेल्याने दादांची भेट होऊ शकली नाही, असेही ते म्हणाले.
बाजार समितीचे सभापती लकी टेलर यांच्या विरोधात गुरुवारी भाजपा व शिवसेनेच्या संचालकांनी अविश्वास ठरावासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर लकी टेलर यांनी शुक्रवारी राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, शुक्रवारी लकी टेलर यांनी राजीनामा न दिल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यावर आपण सुरेशदादा जैन यांची भेट घेऊन राजीनामा देणार असल्याचे शुक्रवारी सभापती पाटील यांनी सांगितले होते. शनिवारीदेखील त्यांची सुरेशदादा जैन यांच्याशी भेट झाली नाही. असे असले तरी अविश्वास प्रस्ताव मंजुरीपूर्वीच आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एक वर्ष झाले तरी राजीनामा दिला नसल्याची व इतर खोटी माहिती माझ्या संदर्भात पसरविली जात असल्याचा दावादेखील पाटील यांनी केला.
दरम्यान, १५ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर या संदर्भात विशेष सभा घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
सुरेशदादाच माझे नेते
सुरेशदादा जैन हेच माझे नेते असून त्यांची भेट घेऊन आपण चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दादांनी राजीनामा द्यायचा सांगितला तर मी राजीनामादेखील देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Will resign before unbelief - Christubha Speaker Lucky Taylor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव