रस्त्यांची दुरूस्ती होईल का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:14 PM2019-06-26T12:14:51+5:302019-06-26T12:15:18+5:30

खड्ड्यांच्या समस्यांनी शहरवासी आधीच हैराण

Will the roads be repaired? | रस्त्यांची दुरूस्ती होईल का

रस्त्यांची दुरूस्ती होईल का

googlenewsNext

अर्धवट रस्ते, जागो-जागी पडलेले खड्ड्यांच्या समस्यांनी शहरवासी आधीच हैराण आहेत़ त्यात आणखी अमृत योजनेतंर्गत जलवाहिन्यांचे टाकण्याचे काम सुरू आहेत़ त्यामुळे जागो-जागी रस्ते खोदली गेली आहेत़ मात्र, त्यांची दुरूस्ती थातूर-मातूर केल्यामुळे शहरातील समस्यांमध्ये आणखींन भर पडली आहे़ हातावर मोजक्याच रस्त्यांची जलवाहिनी टाकल्यानंतर दुरूस्ती करण्यात आली़ मात्र, अनेक गल्ली, चौकातील खोदकाम झाल्यानंतर त्या रस्त्यांची दुरूस्ती न करताच त्याच मातीने ते खड्डे बुजविण्यात आली आहेत़ त्यामुळे रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाली असून पायी चालणे कठीण झाले आहे़ दुसरीकडे वाहनधारकांना पाठीचा आजार जडण्यास सुरूवात झाल्याचे चित्र दिसत आहे़ आता पावसाळ्याला सुरूवात झाली असून ठिकठिकाणी चिखल होत आहे़ या चिखलातून वाहने घसरून अपघात होण्याची देखील शक्यता आहे़ दरम्यान, काही रस्त्यांवर दोन ते तीन महिन्यांपूर्वी रस्त्यांना ठिगर लावण्याचे काम करण्यात आले़ पण रस्त्यांची सुध्दा दुर्दशा झालेली आहे़ आता तरी प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरूस्ती करावी, जेणे करून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही व कुठलाही जीवीतास धोका राहणार नाही,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे़ ज्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, त्या रस्त्यांची काही प्रमाणात का होईना, त्यांची दुरूस्ती व्हावी, ही नागरिकांकडून होत आहे़ आता त्याकडे महापालिकाने लक्ष देणे महत्वाचे आहे़ अमृतच्या कामांमुळे जलवाहिनी टाकण्यासाठी खड्डे खोदली गेलीत़ त्यामुळे दिवसातच नव्हे तर रात्रीच सुध्दा धुळ मोठ्या प्रमाणात हवेत मिश्रीत होत असल्यामुळे श्वसनालाही त्रास होण्याची शक्यता वाढली आहे़
-गणेश कोळी, पिंप्राळा

Web Title: Will the roads be repaired?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव