महिला दक्षता समितीच्या बैठकीत वादळी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:51 AM2018-08-13T00:51:42+5:302018-08-13T00:52:11+5:30

पारोळा येथे पोलीस व पालिका प्रशासनाने गांभिर्याने घेण्याची मागणी

Windy discussion at the meeting of the women's Vocational Committee | महिला दक्षता समितीच्या बैठकीत वादळी चर्चा

महिला दक्षता समितीच्या बैठकीत वादळी चर्चा

googlenewsNext


पारोळा, जि.जळगाव : बाजारपेठेतील अतिक्रमण, उघड्यावर खाद्यपदार्थ व मांस विक्री यासह इतर विषयांवर महिला दक्षता समितीची सभा वादळी ठरली.
पारोळा पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी दोन वाजता पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महिला दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.
बाजारपेठ ठेलागाडीधारकांचे वाढलेले अतिक्रमण यावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी, बाजारपेठेत उघड्यावर मांस विक्री केली जाते, बाजारपेठत खाद्यपदार्थ उघडे विकले जातात, त्यावर माशा बसतात यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येऊ पाहत आहे. गेल्या ३० वर्षापूर्वी ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे ती तशीच आहे. लोकसंख्या दुपटीने वाढली पण बाजारपेठ आहे तिथेच आहे. याचा सर्वाधिक त्रास महिला वर्गाला होत आहे. आता तर राजकारण्यांनी शहाणे होऊन ही बाजारपेठ आंग्रे तलावात स्थलांतरित करावी, अशी सूचना व मागणी या बैठकीत महिला दक्षता समितीच्या प्रमुख डॉ.मंदाकिनी पाटील यांनी केली.
शहरातील बालाजी मंदिराचा ध्वनिक्षेपकाचा आवाज मोठा असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होतो म्हणून मंदिर प्रशासनास आवाज कमी करण्यासाठी सूचना देण्यात यावी, असे सांगण्यात आले. राममंदिर परिसरात अवैध धंदे दारू मोठ्या प्रमाणावर विकली जाते. दारू पिऊन काही दारुडे झिंगत शिवीगाळ करतात. त्याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. ठेल्या गाडीवर सोडा बॉटलमध्येही दारू विकली जाते. पोलीस प्रशासनाने यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली,
तसेच डीजेचे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी डीजेवर कायमची बंदी घालण्यात यावी, असाही विषय या बैठकीत घेण्यात आला. त्यावर कडक उपाययोजना आखली जाईल, असे पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांनी सांगितले. तसेच दर महिन्याला दोन दिवस बाजारपेठत पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन आणि महिला दक्षता समिती असे पथक फिरून या सर्व गोष्टींना चाप बसविणार आहेत.
या बैठकीला महिला दक्षता समितीच्या डॉ.मंदाकिनी पाटील, विजया बंडू वाणी, संध्या पी. मुंदाणकार, शुभांगी नितीन मोहरीर, सुनंदा शेंडे आदी उपस्थित होते.
या वेळी महिला दक्षता समितीची पुनर्रचना करण्यात येऊन सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या महिला प्राधान्यक्रमाने या समितीत घेण्यात यावे, असे सर्वानुुमते ठरले. पो.काँ.सुनील पवार यांनी आभार मानले.

Web Title: Windy discussion at the meeting of the women's Vocational Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.