दिनकर महाले, अ़श्विनी काटोले खान्देश रनचे विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:31 PM2019-11-24T12:31:32+5:302019-11-24T12:40:08+5:30

२१ किमी अर्धमॅरेथॉन

 Winner of Dinkar Mahale, Ashwini Katole Khandesh Run | दिनकर महाले, अ़श्विनी काटोले खान्देश रनचे विजेता

दिनकर महाले, अ़श्विनी काटोले खान्देश रनचे विजेता

googlenewsNext
ठळक मुद्दे हजारो जळगावकर धावले

जळगाव : जळगाव रनर्सने आयोजित केलेल्या २१ किमी खान्देश रन या अर्धमॅरेथॉनमध्ये १८ ते ४० वयोगटात पुरूषांच्या गटात दिनकर महाले आणि महिला गटात अश्विनी काटोले यांनी विजय मिळवला. दिनकर महाले याने १ तास १३ मिनिट १२ सेंकदांची वेळ नोंदवली तर अश्विनी हीने १ तास ३९ मिनिट १७ सेकंदात शर्यत पुर्ण केली. यावेळी झालेल्या २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि तीन किमी फन रनमध्ये हजारो जळगावकर धावले.
सागर पार्क येथे आयोजित करण्यातआलेल्या या खान्देश रनचे उद््घाटन रविवारी सकाळी ५.३० वाजता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन,खान्देश रनचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर सतिश गुजरान यांच्या उपस्थितीत थाटात करण्यात आले.
या शर्यतीच्या मार्गावर धावपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी जळगाव रनर्सने विविध उपक्रम राबवले. मार्गावर काव्य रत्नावली चौकात ढोल ताशा पथक होते. तसेच नववारी साड्या नेसलेल्या महिलांनी धावपटूंसोबत काही अंतर धावून त्यांना प्रोत्साहित केले. फिनिशिंग पॉईंटवर देखील रनर्स ग्रुपचे सदस्य आणि पेसर धावपटूंना प्रोत्साहित करत होते.
स्पर्धेचा निकाल - (प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे)
२१ किमी - पुरूष - १८-४० वर्षे - दिनकर महाले, ( १ तास १३ मिनिटे १२ सेकंद ), सोमनाथ पावरा (१ तास १५ मिनिटे १९ सेकंद), अभिमान महाले (१ तास १७ मिनिटे १४ सेकंद), ४१ वर्षावरील - केशव सासुळदे ( १ तास ३४ मिनिटे १६ सेकंद ), किशोर धनकुले ( १ तास ३६ मिनिटे ४६ सेकंद ), डॉ. राहूल महाजन ( १ तास ४८ मिनिटे १२ सेकंद )
महिला - १८ - ४० वर्षे - अश्विनी काटोले (१ तास ३९ मिनिटे १७ सेकंद), अनुषा महाजन (२ तास १५ मिनीटे १० सेकंद), कविता पाटील (२ तास १५ मिनिटे ४२ सेकंद). ४१ वर्षावरील - शारदा भोयर (१ तास ५८ मिनिटे ५२), विद्या बेंडाळे (२ तास २२ मिनिटे ३९ सेकंद)
१० किमी - महिला - भगत सिंग वळवी (३२ मिनिटे ४८ सेकंद), दिनेश वसावे (३३ मिनिटे), लालसिंग पावरा (३३ मिनिटे ४०)
३६ ते ५० वर्षे - पुरूष - सारंग विंचुरकर (४२ मिनिटे ४५ सेकंद), अनिल पठाडे (४४ मिनिटे ७ सेकंद) , दत्तकुमार सोनवणे(४६ मिनिटे १७ सेकंद) , ५१ किमी पेक्षा जास्त - नागुराव भोयर(४५ मिनिटे ५६ सेकंद), पंढरीनाथ चौधरी (५२ मिनिटे ४१ सेकंद), दामोदर वानखेडे (५३ मिनिटे ३ सेकंद),
१० किमी महिला - १८ वर्षा वरील - अनिता भिलाला (४७ मिनिटे २३ सेकंद), उज्ज्वला बारी (४९ मिनिटे ५३ सेकंद),प्रिया पाटोळे (५० मिनिटे ५७ सेकंद), ३१ ते ४५ वर्षे - शोभा यादव (४८ मिनिटे ५८ सेकंद), वैशाली बडगुजर (१ तास २ मिनिट १४ सेकंद), अर्चना काबरा(१ तास २ मिनिटे ४७ सेकंद).

४६ ते ९९ वर्षे - छाया तायडे (१ तास ४ मिनिटे ११ सेकंद), मीना डाकलिया ( १ तास ११ मिनिटे ४ सेकंद), शलाका वाघण्णा,(१ तास ११ मिनिटे ६० सेकंद)
५ किमी - पुरूष - काशिराम बारेला, विनोद कोळी, सर्वेश करकरे,
महिला - सिंड्रेला पवार, छाया डोळे, उल्का मोरे
तीन किमी - पुरूष - चंदन महाजन, विनय चौधरी, शुभम पाटील, महिला- पिंकी कोठारी, पल्लवी पाटील, पुनम भांबरे

या स्पर्धेत सर्वात कमी वयात १० किमीची शर्यत शकिला वसावे हीने पुर्ण केली. १२ वर्षांच्या शकिला हिने ३९ मिनिटात १० किमीचे अंतर पुर्ण केले तर सर्वात वयोवृद्ध धावपटू ८६ वर्षांचे डॉ. जे.एस . मुळीक ठरले. तर प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर सिकची यांनी देखील ७९ व्या वर्षी ही मॅरेथॉन पुर्ण केली.

Web Title:  Winner of Dinkar Mahale, Ashwini Katole Khandesh Run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.