मू़ ज़े महाविद्यालयाचा संघ ठरला विजेता
By admin | Published: January 24, 2017 01:09 AM2017-01-24T01:09:06+5:302017-01-24T01:09:06+5:30
प्रताप महाविद्यालय दुस:या स्थानी
19 पासून उमवि व धनाजी नाना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या युवारंग युवक महोत्सवाचा सोमवार, 23 रोजी समारोप झाला़ प्रसंगी विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आल़े माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, आमदार हरिभाऊ जावळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थित होती़ अध्यक्षस्थानी उमविचे कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष तथा तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार शिरीष चौधरी, बीसीयुडी संचालक प्रा. पी. पी. माहुलीकर, कार्याध्यक्ष दिलीप रामू पाटील, प्र.कुलसचिव प्रा.ए.बी. चौधरी, परीक्षा नियंत्रक डॉ. धनजंय गुजराथी, प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा.सत्यजित साळवे, माजी संचालक विलास चव्हाण, युवारंग समन्वयक प्रा़ए़आय़ भंगाळे, फार्मसीचे प्राचार्य व्ही़ आऱ पाटील, प्राचार्य जयश्री नेमाडे, प्राचार्य आऱएल़ चौधरी, सेवानिवृत्त प्राचार्य एस़एस़पाटील, संस्थेचे पदाधिकारी डॉ़एस़क़ेचौधरी, प्रा़एस़एम़चौधरी, प्रा़एम़टी़फिरके, लीलाधर चौधरी, प्रा़क़ेआऱचौधरी, प्रभात चौधरी, विद्यार्थी प्रतिनिधी विशाखा महाजन, धनश्री चांदोडे, दिगंबर पवार उपस्थित होत़े संघ व्यवस्थापकांच्या वतीने प्रा.योगिता पाटील (धुळे), प्रा.जुगलकिशोर दुबे (जळगाव) यांनी तर सहभागी विद्याथ्र्यांच्या वतीने सचिन देवरे (धुळे), उत्कर्षा पाटील (अमळनेर) या विद्याथ्र्यांनी मनोगत व्यक्त केले.
सलग चौथ्यांदा
मिळवले जेतेपद
फैजपूर : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या युवारंग महोत्सवाचा सोमवारी सकाळी समारोप झाला़ सलग चौथ्यांदा जळगावच्या के.सी.ई. सोसायटी संचलित मूलजी जेठा महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावत डॉ़ ज़ेडी़ बेंडाळे चषकावर आपले नाव कोरल़े अमळनेरच्या खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाला उपविजेतेपद पटकावल़े