पारोळा येथील किसान महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 04:16 PM2020-01-12T16:16:09+5:302020-01-12T16:17:29+5:30
किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विचखेडे, ता.पारोळा येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले.
पारोळा, जि.जळगाव : येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विचखेडे, ता.पारोळा येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले. सात दिवसीय शिबिराचा समारोप संस्थाध्यक्ष, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
व्यासपीठावर जिल्हा बँक सदस्या तिलोत्तमा पाटील, प्रा.रंजना देशमुख, जि.प.सदस्य रोहन पाटील, विचखेडे गावचे सरपंच बाबूलाल माळी, माजी सरपंच विजय निकम, वि.का.संस्थेचे चेअरमन दिलीप निकम, शांताराम गढरी, रवींद्र शिंपी, महेंद्र निकम, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका लता बैसाणे, प्राचार्य डॉ.वाय. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.जी. एच .सोनवणे , डॉ .ए .टी.गव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरार्थी विद्यार्थ्यांमधून अश्विनी पवार, गायत्री पाटील, सुनीता माळी, विशाल पाटील यांनी मनोगतातून शिबिरात स्वयंशिस्त, स्वयंशिस्तीचे मिळालेले धडे, शिबीरात सुख-दु:ख कसे वाटून घेतले, या सात दिवसात आलेले अनुभव कथन केले.
अध्यक्षस्थानावावरून डॉ सतीश पाटील म्हणाले की, या श्रमसंस्कार शिबिरातून मिळालेले संस्कार शिक्षण हे व्यक्तीच्या श्वासापर्यंत टिकून राहते. प्रत्येक विद्यार्थ्यांला संस्कारशील जीवन जगता आले पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या व्यवसायाशी निष्ठा ठेवून काम केले तर उद्याची पिढी संस्कारक्षम झाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद व्यक्त केला.
या सात दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांनी गावात स्वछता मोहीम राबविली. गटारी स्वच्छ केल्या. विविध एकांकिका, नाटक पथनाट्यातून समाज प्रबोधन केले. ग्रामस्थासमोर अंधश्रद्धा, हुंडाबळी, एकच प्याला, व्यसनाधिनता यासारखे कार्यक्रम घेतले.
सूत्रसंचालन प्रा.ए.एल.पवार, तर आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.आशा बोरसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.संजय पाटील, प्रा. सूर्यवंशी, शशिकांत पाटील, प्रा. औजेकर, बंटी पाटील यांनी परिश्रम घेतले.