मंगल कार्यालया मालकांवरील गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:19 AM2021-02-25T04:19:46+5:302021-02-25T04:19:46+5:30
भेटीत मंगल कार्यालयांवर करण्यात आलेल्या दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारी सकाळी हॉटेल क्रेझीहोम या ठिकाणी शहरातील ...
भेटीत मंगल कार्यालयांवर करण्यात आलेल्या दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारी सकाळी हॉटेल क्रेझीहोम या ठिकाणी शहरातील सर्व मंगल कार्यालये, हॉल व मंडप व्यावसायिकांची बैठक झाली. या बैठकीनंतर जळगाव टेंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ, बालाणी लॉन्सचे मालक भगत बालाणी, हॉटेल क्रेझी होमचे चंदन अग्रवाल, कमल पॅराडाईजचे विजय खडके यासह अमित आहुजा, किशोर महाजन, राजेश नाईक, तुषार दापोरेकर, प्रतिश चोरडिया, संतोष दप्तरी, अजय अग्रवाल यांनी मनपात जाऊन आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लग्न सभारंभात आचारी व त्यांचे मदतनीस, भटजी फोटोग्राफर यांना या ५० लोकांच्या पाहुणे मंडळीतून सुट देण्याची मागणी केली. यावर आयुक्तांनी ही मागणी मान्य केली. तर ५० च्या वर नागरिकांची संख्या झाली तर, मंगल कार्यालय मालक संबंधित लग्न समारंभातील वीजपुरवठा बंद करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांना दिले. तसेच याबाबत कारवाईसाठी प्रशासनालाही कळविणार असल्याचे सांगितले. तसेच लग्नाचा मंडप या पुढे ५० लोकांना पुरेल एवढाच लावण्यात येणार असल्याचेही आश्वासनही आयुक्तांना दिले.
इन्फो :
गुन्हे मागे घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी भेटून निर्णय घेण्याचे आश्वासन
या भेटीत या टेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंगल कार्यालय मालकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी आयुक्तांनी लावून धरली. यावेळी आयुक्तांनी याबाबत गुरूवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच दंडाची रक्कम कमी करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे या बैठकीत सांगितले.