‘मौलाना सिद्दिकींवरील खटले मागे घ्या!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:18 AM2021-09-27T04:18:15+5:302021-09-27T04:18:15+5:30

भुसावळ : उत्तर प्रदेशात मौलाना आणि त्यांचे साथीदार उलेमा-ए-किरम यांची तत्काळ सुटका करावी. याबाबतचे निवेदन मुस्लिम बांधवांनी प्रांतांना दिले. ...

‘Withdraw lawsuits against Maulana Siddiqui!’ | ‘मौलाना सिद्दिकींवरील खटले मागे घ्या!’

‘मौलाना सिद्दिकींवरील खटले मागे घ्या!’

Next

भुसावळ : उत्तर प्रदेशात मौलाना आणि त्यांचे साथीदार उलेमा-ए-किरम यांची तत्काळ सुटका करावी. याबाबतचे निवेदन मुस्लिम बांधवांनी प्रांतांना दिले.

धर्मांतरविरोधी विधेयक उत्तर प्रदेशच्या आदित्यनाथ सरकारने मुस्लिम द्वेषाचे राजकारण करून आणले. त्या अंतर्गत उमर गौतम व इतर मुस्लिमांना प्रथम अटक करण्यात आली. हजरत मौलाना कलीम सिद्दिकी यांच्यावरील खटले मागे घ्यावेत, त्यांना तत्काळ न सोडल्यास मुस्लिम समाजात संताप पसरेल. याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देताना म्हटले आहे.

या निवेदनात बहस्त-ए-इस्लामी, जमिआतुल उलेमा, जमात-ए-इस्लामी, जळगाव जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक कमिटी, इस्लामे युथ फेडरेशन, बागवान युवा फाउंडेशन, ए. एम. आय. एम., सन्मान फाउंडेशन, जामिया किफातूल उलमा, जळगाव जिल्हा गवळी समाज, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक कल्याण समिती मुंबई, खाटीक जमात भुसावल, मुस्लिम नुमाइंदा फाउंडेशन, मेहबूब इलाही बहुद्देशीय मंडळ, तब्लिघी जमात, फिक्रे मिल्लत फाउंडेशन, अंजुमन ए अहले सुन्नतवल जमात, मनियार जमात आदी समाजबांधवांच्या निवेदनात स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: ‘Withdraw lawsuits against Maulana Siddiqui!’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.