हकालपट्टी होऊनही कर्मचाºयाकडून पैसे वसुली

By admin | Published: March 20, 2017 12:35 AM2017-03-20T00:35:24+5:302017-03-20T00:35:24+5:30

हकालपट्टी होऊनही कर्मचाºयाकडून पैसे वसुली

Withdrawal from the employee even after expulsion | हकालपट्टी होऊनही कर्मचाºयाकडून पैसे वसुली

हकालपट्टी होऊनही कर्मचाºयाकडून पैसे वसुली

Next

जळगाव : दादागिरी, शिवीगाळ करणे, अतिक्रमणधारकांकडून पैसे मागणे, जप्त केलेला माल परस्पर विकणे आदी आरोपांवरून अतिक्रमण निर्मूलन विभागातील ६ कर्मचाºयांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.  त्या कर्मचाºयापैकी एक कर्मचारी अस्थायी असल्याने त्यास १ हजार रूपये दंड करून तर उर्वरित कर्मचाºयांच्या दोन वेतनवाढ गोठवित व हमीपत्र घेत त्यांना अन्य विभागात रूजू करून घेण्यात आले आहे. मात्र तरीही यातील एका कर्मचाºयाने शनिवारी सुभाष चौकात जाऊन पोलीस चौकीजवळ बसूनच हॉकर्सकडून जप्त केलेले काटे परत मिळवून देण्यासाठी ५०-५० रुपये गोळा केल्याची तक्रार नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. तर हॉकर्स फेडरेशनकडून सोमवारी तक्रार केली जाणार असल्याची माहिती होनाजी चव्हाण यांनी दिली.
या ६ कर्मचाºयांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र घेण्यात आले.  असे असतानाही एका कर्मचाºयाने शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सुभाष चौकात जाऊन तीन ते चार लोकांकडून जप्त केलेले काटे परत आणून देतो असे सांगत प्रत्येकी १५० रूपयांची मागणी केली. त्यापैकी ५०-५० रुपये गोळा केले. तसेच काट्यांचे नंबरही घेतले. काही युवकांनी यावेळी त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशीही वाद घातला.   याबाबत नगरसेवक पृथ्वराज सोनवणे यांना माहिती मिळाली असता त्यांनी फोटोसह सर्व माहिती आयुक्तांना कळवून कारवाईची मागणी केली.

Web Title: Withdrawal from the employee even after expulsion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.