साडे तीन तासात जळगावातील तीन परिसर झाले चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:42 PM2017-08-27T12:42:28+5:302017-08-27T12:43:37+5:30

स्वच्छता मोहिम : रोटरी क्लब इस्ट व नांद्रा येथील मोरया ग्रुपचा सहभाग

Within three and a half hours, there are three areas of Jalgaon clean | साडे तीन तासात जळगावातील तीन परिसर झाले चकाचक

साडे तीन तासात जळगावातील तीन परिसर झाले चकाचक

googlenewsNext
ठळक मुद्देमोरया ग्रुपचे जिल्हाधिका:यांनी केले कौतुकदुकानदार, लोटगाडी विक्रेत्यांची कानउघडणीरहिवासी, विक्रेत्यांनी केले स्वागत

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 - टॉवर चौक परिसर, बहिणाबाई उद्यान ते आकाशवाणी चौक तसेच बळीरामपेठ परिसरात गणेश मूर्ती व पूजा-विधी साहित्य विक्रेत्यांमुळे गणेश चतुर्थीला पसरलेली अस्वच्छता  रोटरी क्लब ऑफ ईस्ट, नांद्रा येथील मोरया  ग्रुप व महापालिकेने शनिवारी संयुक्तरित्या स्वच्छता मोहिम राबवून दूर केली. सकाळी 6़30 ते 10 वाजेदरम्यान ही  मोहिम राबवून परिसर चकाचक केला़ जिल्हाधिकारी स्वत: कचरा उचलताना दिसून आल्याने नागरिकही उस्त्फूर्तपणे या मोहिमेत सहभागी झाले होते. 
मल्टिमीडियाच्या मार्गदर्शनाखाली नांद्रा बुद्रूक येथून मोरया  ग्रुपचे सदस्य झाडू, फावडे, टोपल्या आदी साहित्य घेवून हजर झाल़े यात  ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, सुनील सोनवणे, समाधान सोनवणे, मयुरेश शिंपी, सागर सोनवणे, आशिष सोनवणे, किरण रुले, निखिल चव्हाण, विकास सोनवणे, निलेश ठाकरे, विशाल चौधरी, पंकज सोनवणे, राहुल सुरळकर यांचा समावेश होता़ जिल्हाधिका:यांनी शहर पोलीस ठाण्यात एकत्र आल्यानंतर मोरया गृपमधील तरुणांचे कौतुक केल़े या गृपला वृक्षारोपणासाठी वड, निंब, पिंपळची 150 रोपे देण्याचे आश्वासन दिले.
हा कचरा उचलला
केळीचे खांब, दुर्वा, केळीची पाने, फुले, खोके, कागदे, प्लास्टिक पिशव्या, फळे रस्त्यावर पडलेले होते. आदल्या दिवशी दहा ते 20 रुपयाला मिळणा:या वस्तू शनिवारी विक्रेत्यांनी फेकून  दिल्या होत्या.
फुले मार्केट परिसरात सकाळी काही फळ विक्रेते, फुल विक्रेते दुकाने लावतात़ तसेच नाश्त्याच्याही गाडय़ा लागतात़  या गाडय़ांसमोर कचरा दिसल्याने जिल्हाधिका:यांनी संबंधित दुकानदार, विक्रेत्यांची कानउघाडणी केली़  यापुढे कचरा दिसल्यास गाडय़ा जमा करुन घेवूअशी तंबी दिली़ तसेच अतिक्रमण निमरूलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांना त्याबाबतच्या सूचनाही दिल्या़
जिल्हाधिकारी किशोराजे निंबाळकर यांनी यापूर्वी गोलाणी मार्केटमध्ये जोरदार स्वच्छता मोहिम राबविली होती. आज  फुले मार्केट परिसर व बहिणाबाई उद्यान परिसरात स्वच्छता मोहिम राबविली. मोहिम सुरु असता फुले मार्केट परिसरात एका फुल विक्रेत्या महिलेने त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केल़े तसेच येथील रहिवासी तसेच इतर विक्रेत्यांनीही स्वच्छतेबद्दल त्यांचे आभार मानल़े
यांचा होता सहभाग
स्वच्छता मोहिमेत आर्किटेक्ट शिरिष बव्रे, रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टचे अध्यक्ष डॉ़ गोविंद मंत्री, सचिव मनीष पात्रीकर, राजू बियाणी, डॉ़ जगमोहन छाबडा, शरद जोशी, डॉ़ निरज अग्रवाल, योगेश व्यास, डॉ़ जितेंद्र कोल्हे, सागर मुंदडा, प्रितेश चोरडीया, डॉ.पी.एम. भंगाळे, राजीव बियाणी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, निमित कोठारी व मोरया गृप यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित स्वच्छता केली़
जिल्हाधिकारी,महापौर यांनी हातात घेतला झाडू
रोटरी क्लब ईस्टतर्फे स्वच्छतेसाठी तालुक्यातील नांद्रा बुद्रूक येथील मोरया  ग्रुपचे सहकार्य घेण्यात आले. सर्व पदाधिकारी व मोरया गृपचे सहकारी सकाळी 6 वाजता बहिणाबाई उद्यान परिसरात  हजर झाल़े सकाळी 6़30 वाजता जिल्हाधिकारी पोहचले व हातात झाडू घेवून स्वच्छतेस तसेच कचरा गोळा करण्यास सुरुवात केली़ प्रभारी महापौर ललित कोल्हे, माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह कार्यकर्तेही मोहिमेत सहभागी झाल़े कचरा जास्त व सफाई करणारे कमी यामुळे जिल्हाधिका:यांनी महापालिकेचे सफाई कर्मचारी व वाहने या ठिकाणी बोलावली़ काही वेळातच कामगारांचा ताफा वाहनांसह घटनास्थळी पोहचला. 
सुरुवातीला केवळ बहिणाबाई उद्यान परिसर स्वच्छतेचे नियोजन होत़े मात्र नितीन लढ्ढा यांनी यापेक्षा जास्त फुले मार्केट परिसरात अस्वच्छता असल्याची माहिती दिली. त्यानुसार सकाळी 8़30 वाजता जिल्हाधिका:यांसह सर्व ताफा फुले मार्केट परिसरात पोहचला़ याठिकाणी केवळ दोन ते तीन महिला कर्मचारी सफाई करत होत्या़ 
  सकाळी 10़15 वाजेर्पयत टॉवर चौक ते भिलपुरा चौकीर्पयतचा परिसर चकाचक झाला होता़ सहा ट्रॅक्टर, दोन डंपरमध्ये कच:याचे संकलन करण्यात आल़े काही ठिकाणी जेसीबीच्या मदतीने कचरा उचलण्यात आला़ परिसरातील नाल्यांमध्ये चार ते पाच दिवसात विविध प्रकारच्या वस्तू गटारींमध्ये अडकल्याने त्या तुंबल्या होत्या़ गटारी मनपाच्या सफाई कर्मचा:यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आल्या़
वाहनात कचरा भरुन लावली विल्हेवाट
महापालिका कर्मचारी, मोरया  ग्रुप, रोटरी क्लब ऑफ ईस्टचे पदाधिकारी अशा सर्वाच्या श्रमदानातून दोन तासात बहिणाबाई उद्यान ते आकाशवाणी चौक परिसर चकाचक केला. कचरा गोळा करुन वाहनांमध्ये भरुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली़  कधी नव्हे एवढा हा परिसर चकाचक दिसून आला़

Web Title: Within three and a half hours, there are three areas of Jalgaon clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.